Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > आहे मी जाड, काय बिघडलं? असं म्हणून दुर्लक्ष करणं टाळा, तज्ज्ञ सांगतात..

आहे मी जाड, काय बिघडलं? असं म्हणून दुर्लक्ष करणं टाळा, तज्ज्ञ सांगतात..

Misconception about Obesity Doctor Suggest : लठ्ठपणा स्वीकारणे आणि त्याचा उघडपणे पुरस्कार करणे हे समाजासाठी अतिशय घातक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 05:15 PM2022-10-06T17:15:20+5:302022-10-06T17:18:26+5:30

Misconception about Obesity Doctor Suggest : लठ्ठपणा स्वीकारणे आणि त्याचा उघडपणे पुरस्कार करणे हे समाजासाठी अतिशय घातक आहे.

Misconception about Obesity Doctor Suggest : I'm fat, what's wrong? Avoid ignoring it, experts say. | आहे मी जाड, काय बिघडलं? असं म्हणून दुर्लक्ष करणं टाळा, तज्ज्ञ सांगतात..

आहे मी जाड, काय बिघडलं? असं म्हणून दुर्लक्ष करणं टाळा, तज्ज्ञ सांगतात..

Highlightsजिवलगांपैकी कोणी लठ्ठ असेल तर त्यांना खासगीत वजन कमी करायला नक्कीच प्रवृत्त करायला हवे. आहार, व्यायाम यांचा उत्तम समतोल असेल तर आपले वजन प्रमाणाबाहेर वाढणार नाही आणि त्याचा आरोग्याला त्रासही होणार नाही. 

डॉ. शिल्पा चिटणीस


सध्या आम्हा सर्वच डॉक्टरांना रुग्णांमध्ये असलेला लठ्ठपणा ही समस्या कशी हाताळावी हा यक्षप्रश्न पडलेला आहे .त्यात भर म्हणून "माझे शरीर आहे तसे च मला आवडते आणि माझ्या या (जास्त वजन असलेल्या) शरीराचा मला अभिमान आहे" वगैरे ट्रेंड सोशल मीडिया वर फिरत आहेत. हे खूप धोकादायक आहे असं मला वाटतं. लठ्ठपणा ही आरोग्यासाठी खूप मोठी समस्या आह. माणसाला होणाऱ्या बऱ्याच रोगांचे मूळ लठ्ठपणात आहे .सांधेदुखी पासून हृदयरोग, बऱ्याच प्रकारचे कॅन्सर असे बरेच आजार लठ्ठपणापासून सुरू होतात. लठ्ठपणा स्वीकारणे आणि त्याचा उघडपणे पुरस्कार करणे हे समाजासाठी अतिशय घातक आहे (Misconception about Obesity Doctor Suggest).

(Image : Google)
(Image : Google)

आधीच भारतात मधुमेहींची संख्या जगात सर्वात जास्त आहे त्यात लठ्ठपणाचे कौतुक म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखे आहे. पुणे दुर्दैवाने  या बाबतीत आघाडीवर आहे. लठ्ठपणा दिसायला वाईट म्हणून त्यावर टीका होत नाहीये तर ती आताच्या पिढीला भेडसावणारी एक आरोग्यसमस्या आहे. यामुळे माणसाचे आयुष्य दुर्धर होऊ शकते म्हणून लठ्ठपणाचा स्वीकार करणे आणि या गोष्टीला ग्लॅमराईझ करणे अयोग्य ठरेल. वैद्यकीय दृष्टीने लठ्ठपणा (Obesity)म्हणजे बॉडी मास इंडेक्स (BMI) 30 च्या जवळपास आणि कंबर नितंब (WHR)प्रमाण 1 पेक्षा जास्त असणे, चार पाच किलो इकडे तिकडे खूप काळजी करण्यासारखे नाही. मात्र यावेळी आपण बॉर्डरलाईनवर आहोत हे ओळखायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

यामध्ये अजून एक मुद्दा म्हणजे वजन जास्त आहे म्हणून चारचौघात कोणाची चेष्टा करणे निषेधार्ह आहे परंतु आपल्या जिवलगांपैकी कोणी लठ्ठ असेल तर त्यांना खासगीत वजन कमी करायला नक्कीच प्रवृत्त करायला हवे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली जीवनशैली चांगली हवी. यातही आहार, व्यायाम यांचा उत्तम समतोल असेल तर आपले वजन प्रमाणाबाहेर वाढणार नाही आणि त्याचा आरोग्याला त्रासही होणार नाही. 

 

(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Misconception about Obesity Doctor Suggest : I'm fat, what's wrong? Avoid ignoring it, experts say.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.