बदलत्या जीवनशैलीचा फटका सर्वांनाच बसत आहे. अपुरी झोप, शारीरिक हालचाल कमी होणे, सकस आहार न घेणे, यासह इतर समस्यांमुळे वजन झपाट्याने वाढते (Weight Loss Drink). वजन वाढले की, मधुमेह, बॅड कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर यासह इतर गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे वेळीच वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. जर आपल्याला देखील व्यायाम आणि डाएटकडे पुरेसं लक्ष द्यायला जमत नसेल तर, एक मॅजिकल ड्रिंक पिऊन पाहा. या मॅजिकल वेट लॉस ड्रिंकची रेसिपी पोषणतज्ज्ञ शिखा सिंह यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
यासंदर्भात, तज्ज्ञ सांगतात, 'मॅजिकल ड्रिंक वेट लॉससाठी पुरेपूर मदत करेल. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी काही दिवसात कमी होईल. याचा रिझल्ट आपल्याला पहिल्याच आठवड्यात दिसेल. या ड्रिंकच्या पौष्टीक घटकांमुळे भुकेवर नियंत्रण, वेट लॉससाठी मदत, पचनक्रिया सुधारणे, पोटाचे विकार दूर होणे यासह थुलथुलीत पोटाची चरबीही घटेल. त्यामुळे नियमित या वेट लॉस ड्रिंकचं सेवन आपण करायलाच हवे(Magical Weight Loss Drink for Fitness and Bloating)'.
मॅजिकल वेट लॉस ड्रिंक करण्यासाठी लागणारं साहित्य
जिरं
बडीशेप
कमीतकमी वेळात जास्त वजन कसे घटवाल? ५ सोपे हेल्दी बदल - आठवडाभरात दिसेल फरक-स्किनही चमकेल
ओवा
धणे
'या' पद्धतीने तयार करा वेट लॉस ड्रिंक
एका बरणीमध्ये २ चमचे जीरा, २ चमचे बडीशेप, २ चमचे ओवा, २ चमचे धणे घालून मिक्स करा. आता एका भांड्यात एक लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा वेट लॉस मसाला घालून मिक्स करा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा.
आता चहाच्या गाळणीने गाळून ड्रिंक एका कपमध्ये काढून घ्या, आणि कोमट झाल्यानंतर प्या. आपण दिवसभरात या ड्रिंकचे सेवन कधीही करू शकता. नियमित याचे सेवन केल्यास आठवड्याभरात आपल्याला रिझल्ट दिसेल.
वेट लॉस ड्रिंकचे फायदे
जीरा
जिऱ्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात प्रथिने, ऊर्जा, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई इत्यादी पोषक घटक असतात. ज्यामुळे फक्त वेट लॉस नाही तर, पचनक्रिया सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पोटाचे दूर करणे यासह इतर समस्या दूर करण्यास मदत करते.
बडीशेप
जेवणानंतर आपण चमचाभर बडीशेप खातोच. पण त्यात देखील अनेक गुणधर्म आहेत. बडीशेपमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फायबर आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात. त्याचबरोबर बडीशेप थंड असते. ज्यामुळे उन्हाळ्यात आपली बॉडी थंड राहते. शिवाय पचनक्रियाही व्यवस्थित होते.
ओवा
किती आणि कधी पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात, पोट थुलथुलीत असेल तर..
बरेच जण स्वयंपाकात ओव्याचा वापर करतात. ओवा खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते. त्यात अनेक पौष्टीक घटक असतात. ओवा हा फायबर, अत्यावश्यक फॅटी अॅसिड आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत असतो. जे आरोग्याच्या निगडीत अनेक समस्यांवर मात करते.
धणे
अनेकांना ठाऊक आहे, धणे पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदेच फायदे मिळतात. यातील गुणधर्मामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.