एकीकडे आंब्याला फळांचा राजा म्हणता आणि दुसरीकडे मात्र आंब्यामुळे वजन वाढतं, शुगर वाढते म्हणून त्याला हिणवता, हा तुमचा कोणता न्याय... असं म्हणत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आंब्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात असणारे अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आंबे खाण्याविषयी अतिशय रोखठोक बोलताना त्या म्हणाल्या की आपल्याकडे आपण आंबे खाऊन शुगर वाढते, वजन वाढते असं म्हणतो, पण अमेरिकन डायबेटिक असोसिएशनने उन्हाळ्यात जी ६ फळे खाण्याचा सल्ला दिला आहे, त्यामधला एक पदार्थ आहे आंबा.आंबा खाल्ल्याने वजन- शुगर वाढत नाही, उलट त्यातून कोणते फायदे होतात, याविषयाची एक व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ( really mango is responsible for increasing sugar and diabetes?)
उन्हाळ्यात आंबा का खाल्ला पाहिजे याविषयी सांगताना ऋजुता दिवेकर म्हणतात की आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असते.
स्विमिंग पुलमधल्या पाण्याला कशामुळे वास येतो? बघा त्यामागचं खरं कारण, पोहण्यापुर्वी विचार करा...
त्यामुळे त्वचेसाठीही आंबा अतिशय चांगला असतो. आंब्यामध्ये असणारं व्हिटॅमिन बी ६ मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंब्यामध्ये इनसॉल्यूबल फायबर असतात. त्यामुळे तो खाल्ल्याने शुगर क्रेव्हिंग कमी होतं तसेच त्यामध्ये असणाऱ्या सॉल्यूबल फायबरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा, केस, शरीर, हृदय यांच्या आरोग्यासाठी आंबा पौष्टिक ठरतो.
आंब्याविषयी सांगताना ऋजुता म्हणतात की बहुसंख्य लोकांना वाटतं की आंब्यामुळे वजन वाढतं, मधुमेह होऊ शकतो. पण आंबे खाण्यापेक्षाही मधुमेह आणि वजन वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या इतर अनेक गोष्टी आपण करतो.
उदाहरणार्थ जंकफूड खाणे, व्यायाम न करणे, झोपेच्या वेळा न पाळणे, स्मोकिंग करणे... यामुळे मधुमेह आणि वजन या दोन्ही गोष्टी वाढण्याची भीती जास्त आहे. मग आंब्याबाबतच गैरसमज का, असा त्यांचा प्रश्न आहे. रोज १ आंबा खाल्ला तर वजन वाढत नाही, त्यामुळे माेकळ्या मनाने आंबा खाण्याचा आनंद घ्या, असं त्या सुचवत आहेत.