Join us  

खाण्यावर कण्ट्रोल ठवूनही वजन वाढलं? रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात १ गोष्ट घालून प्या; वजन घटणारच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2024 6:05 PM

Mix these 4 things with lemon juice to reduce belly fat : वजन कमी करण्यासाठी या ४ प्रकारे लिंबू पाणी प्या..

लहान मुल असो किंवा वृद्ध व्यक्ती. आजकाल प्रत्येक व्यक्ती वाढत्या वजनामुळे हैराण आहे (Weight Loss). यामुळे गंभीर आजारांचाही धोका वाढतो. काहींवर वजन वाढण्याचं थेट परिणाम केस आणि त्वचेवरही दिसून येतो (Fitness). वजन कमी करण्याचे बरेच फंडे सध्या बाजारात उपलब्ध आहे.

पण व्यायाम आणि डाएट या दोन्ही गोष्टी गरजेचं आहे. पण या दोन्ही गोष्टी करूनही तितकासा चांगला परिणाम दिसून येत नसेल तर, लिंबू पाणी प्या. नियमित रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस प्यायल्याने वेट लॉस होऊ शकते. पण फक्त लिंबू पाणी न पिता त्यात ४ गोष्टी घाला. यामुळे नक्कीच आरोग्याला फायदा होईल, आणि वजनही घटेल(Mix these 4 things with lemon juice to reduce belly fat).

वेट लॉससाठी लिंबू पाण्याचे फायदे

लिंबूमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम, पेक्टिन आणि सायट्रिक ऍसिडसारखे पोषक घटक आढळतात. हे घटक एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहेत. लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट वजन कमी करण्यास मदत करतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासूनही संरक्षण करते.

लिंबू - पुदिना पाणी

वेट लॉससाठी आपण लिंबू - पुदिना पाणी पिऊ शकता. लिंबू आणि पुदिनामध्ये कॅलरीजचे प्रमाण फार कमी असते. यासोबतच पुदिन्यात फायबर देखील असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही. यासाठी आपण कोमट पाण्यात लिंबाचा - पुदिन्याचा रस घालून पिऊ शकता. यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटेल.

बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट

लिंबू आणि काकडीचे पाणी

रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि काकडीचा रस घालून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि फॅट्स बर्न होतात. याशिवाय लिंबू आणि काकडीचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. लिंबू आणि काकडीचे पाणी प्यायल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

लिंबू आणि  आले पाणी

वेट लॉससाठी लिंबू आणि आल्याचं पाणीही फायदेशीर ठरू शकतं. लिंबू आणि आल्यातील पौष्टीक घटक शरीराला डिटॉक्स करतात, शरीरात जमा झालेली घाण आणि फॅट्सबी बर्नही करतात. आपण हे पाणी दिवसभरात २ - ३ वेळा पिऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि आल्याचे पाणी प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

लिंबू आणि मधाचे पाणी

लिंबू आणि मधामुळेही वेट लॉस होऊ शकते. मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त इतरही पौष्टीक गुणधर्म असतात. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स