'जस्सी जैसी कोई नही' फेम मोना सिंग (Mona Singh) हिने नुकतेच वजन कमी केल्याच्या चर्चा समोर येत आहेत. टेलिव्हिजन मालिकेतून आपल्या अभिनयाला सुरुवात करणारी मोना सिंग आज चित्रपट आणि ओटीटी मालिकेतील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. सध्या तिने तिच्या आगामी भूमिकेसाठी वजन कमी केले आहे. विशेष म्हणजे तिने अवघ्या ६ महिन्यांत १५ किलो इतके वजन कमी केले आहे. तिच्या या अवाक करणाऱ्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे, तिने वजन कमी कसे केले असेल असा अनेक चाहत्यांना प्रश्न पडला आहे(mona singh fitness & diet routine for weight loss).
मोना सिंग हिने अत्यंत कमी वेळात वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. वजन कमी करण्यासाठी तिने खूप मेहेनत घेतली. वजन कमी करण्याच्या या प्रवासांत तिने शिस्त पाळली. या काळात तिने खाण्या - पिण्याच्या योग्य सवयी जपल्या त्याचबरोबर फिटनेसवर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते.मोना सिंगने वजन कमी करण्यासाठी नेमकं कोणतं डाएट व रुटीन फॉलो केलं याबद्दल अधिक माहिती घेऊयात(Bollywood Actress Mona Singh Shares Inspiring Weight Loss Journey After 40).
मोना सिंगने वजन कमी करण्याच्या टिप्स शेअर केल्या...
एका मुलाखतीत तिचे वजन कमी करण्यामागचे रहस्य विचारले असता, मोनाने सातत्य आणि शिस्तीचे महत्त्व सांगितले. मोनाने सांगितले वजन कमी करण्यासाठी सातत्य आणि शिस्त या दोन्ही फार महत्वाच्या गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी मी अतिशय काटेकोरपणाने पाळल्या. ती म्हणाली, " जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असता तेव्हा शिस्त ही महत्वाची असते".
८५ वर्षांच्या हेलन फिट राहण्यासाठी करतात पिलाटे, तरुण पिढीलाही लाजवेल असा फिटनेस...
मोना सिंगने वजन कमी करण्यासाठी नेमकं काय केलं ?
१. योगा :- वजन कमी करण्यासाठी मोनाने जिम ऐवजी योगा करणे पसंत केले. जिममध्ये तासंतास वर्कआऊट करण्याऐवजी मोनाने दररोज योगा करण्यास सुरुवात केली. कारण योगा तुमचे वजन कमी करण्यासोबतच अंतर्गत संतूलन राखण्यास मदत करतो. योगा हे वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहे. जर आपल्याला अगदी नैसर्गिकपणे व योग्य पद्धतीने वजन कमी करायचे असल्यास योगा हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
२. इंटरमिटेंट फास्टिंग :- मोना सिंगच्या मते, इंटरमिटेंट फास्टिंगमुळे वजन कमी करण्यास फार मदत होते. इंटरमिटेंट फास्टिंग ही एक आहार घेण्याची पद्धत आहे. या पद्धतीत बराच काळ उपाशी राहून ठराविक वेळेत आहार घेतला जातो. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळेतच जेऊ शकता. यात प्रत्येक दिवशी तुम्ही ठराविक तास उपाशी राहणे आवश्यक आहे. दिवसातून फक्त ठराविक आणि एकाच वेळी जेऊन तुमचे बेली फॅट आणि हट्टी चरबी वितळवू शकता.
स्टार्स-सेलिब्रिटी पितात ती ‘बुलेटप्रूफ कॉफी’ नेमकी असते काय? ती प्यायल्याने वजन कमी होतं ते कसं..
३. प्रथिने आणि फायबरयुक्त आहार :- या काळात तिने आपल्या डाएटची विशेष काळजी घेतली असल्याचे दिसून येते. वजन कमी करण्यासाठी, आपण कोणत्या प्रकारचे अन्न खातो यावर लक्ष देणे सर्वात महत्वाचे असते. सामान्यतः, वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीजचा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो, पण हे पुरेसे नाही. आपल्या रोजच्या डाएटमध्ये, प्रथिने आणि फायबर पुरेशा प्रमाणात असणे देखील महत्त्वाचे असते. प्रथिने आणि फायबरयुक्त आहारामुळे माझा वजन कमी करण्याचा प्रवास खूप सोपा झाला असल्याचे मोना सिंग सांगते. याचबरोबर वजन कमी करण्याच्या या प्रवासात तिने फक्त घरी बनवलेलेच अन्नपदार्थ खाल्ले होते, बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद केले होते.