मंजिरी कुलकर्णी, आहारतज्ज्ञ
भारतीय आहार हा षडरसात्मक आहार म्हणुन ओळखला जातो. खरे पाहिले तर भारतीय आहार जर योग्य प्रमाणात घेतला तर त्यामध्ये शरीराला लागणारे सर्व घटक समाविष्ट असतात. पण आपण पाश्चात्य लोकांचे अंधानुकरण करायला जातो आणि तिथेच चूक होते. पाश्चात्य लोकांनी त्यांच्या आहारातील कमतरता ओळखून त्याप्रमाणे त्यांचा आहार ठरवला आहे. त्याच कमतरता आपल्या आहारात असतीलच असे नाही.(How to use moong dal for getting protein?)
उदाहरणार्थ सलाड. आपल्या आहारात रोजच पिठाची पोळी किंवा भाकरी असल्यामुळे तसे पाहिले तर आपल्या आहारात फायबरसाठी सलाडची आवश्यकता नाही. असे इतरही काही पदार्थ आहेत, जे पाश्चात्यांचे बघून आपण आपल्या आहारात घेतो किंवा काढून टाकतो. भारतीय आहार नक्कीच परिपूर्ण आहे. पण तरी आपण त्याचे प्रमाण आपल्याला आवडेल तसेच घेत असतो आणि हेच आजारांचे मूळ कारण आहे. त्यामुळे आपल्या आवडीपेक्षा आपल्या प्रकृतीनुसार जर आहारात काय कमी आणि काय जास्त घ्यावे, ही ठरवले तर शरीराला सगळेच घटक नक्कीच योग्य प्रमाणात मिळतील. अनेकांच्या आहारात प्रोटीन्सची कमतरता दिसून येते. ही कमतरता भरून काढण्यासाठी एक उत्तम पदार्थ आपल्या स्वयंपाक घरात असतोच आणि तो म्हणजे मुगाची डाळ.
मुगाच्या डाळीचे फायदे
१. सर्व डाळींमध्ये मुगाची डाळ उत्तम, पचायला हलकी आणि प्रोटिन्स भरपूर असणारी आहे.
२. या डाळीतून प्रोटिन्स भरपूर मिळू शकतात.
३. ज्यांना पचनाचा त्रास होतो त्यांनी मुगाची डाळ भाजून वापरावी.
४. वजन कमी होण्यास फायदेशीर.
५. संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण वाढविण्यास उपयुक्त.
६. मुग डाळीत असणाऱ्या विशिष्ट antioxidants मुळे उष्माघात होत नाही.
7. शरीरात पाण्याची पातळी चांगली राखण्यास मदत होते.
सणासुदीला पुरणा-वरणाच्या स्वयंपाकाचं टेन्शन? ८ गोष्टी आधीच करा, फक्त दिड तासात स्वयंपाक तयार...
मुगडाळ कशी खावी?
मुगाच्या डाळीचे वरण, पाणी, खिचडी, वडे, भजी या माध्यमातून आपण मुगडाळ खाऊ शकतो.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.)