Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > जेवण कमी केलं-बंदच केलं तरी वजन घटत नाही? ‘या’ डाळीचं पाणी प्या-वजन उतरेल झरझर

जेवण कमी केलं-बंदच केलं तरी वजन घटत नाही? ‘या’ डाळीचं पाणी प्या-वजन उतरेल झरझर

Moong Dal Water Can Boost Your Weight Loss Journey : प्रत्येकाच्या घरी डाळींचा आहारात समावेश केला जातो. डाळी खाल्ल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 07:31 PM2024-10-17T19:31:09+5:302024-10-17T19:32:44+5:30

Moong Dal Water Can Boost Your Weight Loss Journey : प्रत्येकाच्या घरी डाळींचा आहारात समावेश केला जातो. डाळी खाल्ल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होते.

Moong Dal Water Can Boost Your Weight Loss Journey : Moong Dal Water Is For Weight Loss | जेवण कमी केलं-बंदच केलं तरी वजन घटत नाही? ‘या’ डाळीचं पाणी प्या-वजन उतरेल झरझर

जेवण कमी केलं-बंदच केलं तरी वजन घटत नाही? ‘या’ डाळीचं पाणी प्या-वजन उतरेल झरझर

वजन कमी तुम्ही दिवसरात्र मेहनत करत असाल आणि तरीही रिजल्ट मिळत नसेल तर तुम्ही काही व्यायाम करू शकता किंवा खास पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (Weight Loss Tips) असे पौष्टीक पदार्थ पचायला हलके असतात आणि ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.  प्रत्येकाच्या घरी डाळींचा  आहारात समावेश केला जातो. डाळी खाल्ल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होते. (Moong Dal Water Can Boost Your Weight Loss Journey)

डाळींइतकेच डाळीचे पाणीसुद्धा तब्येतीसाठी गुणकारी मानले ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगानं होते. मूग डाळीचे पाणी पिऊन वजन केस कमी करायचे ते समजून घेऊया. (Weight Loss Tips) मूग डाळीचे पाणी प्यायल्यानं फक्त तुमचे आरोग्यच चांगले राहत नाही वजन कमी होण्यासही मदत होते. मूग डाळीच्या पाण्याचे सेवन कसे करावे समजून घेऊया. 

पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्या म्हणण्यानुसार वजन कमी करण्यासाठी मूग डाळ हा नैसर्गिक घटक आहे. ज्यामुळे आतडे आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते. यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते, फायबर्स असतात. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि जंक फूड खाण्याचे क्रेव्हिंग्स होत नाही (Ref). मूग डाळ खाण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. चिला, दाळ तडका, खिचडी  वेगवेगळ्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता.  रात्रभर मूग भिजवून ठेवून सकाळी या डाळीचे मुगलेट बनवू शकता. 

दिवाळी विशेष : ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० युनिक डिजाईन्स-नव्या पॅटर्नने वाढेल साडीची शोभा

मूग डाळीच्या पाण्यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. प्रोटीन्सचे सेवन केल्यानं सतत भूक लागत नाही आणि वेट मॅनेजमेंट होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त यातील फायबर्समुळे पचनक्रिया चांगली राहते. चांगल्या पचनामुळे शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते आणि वजनही नियंत्रणात राहते. मूग डाळीचे पाणी प्यायल्यानं कॅलरीज कमी होतात याव्यतिरिक्त मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो.

याशिवाय शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते. मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेगानं कमी होते. हा एंटी ऑक्सिडेंट्सचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी  होतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा आणू शकतो. 

मूग डाळीचे पाणी कसे तयार करावे (How To Make Moong Dal Water)

1) मूग डाळ - 1 कप

2) पाणी - 2 कप

3) सैंधव मीठ - 1 चिमूट

मूग डाळ धुवून साफ करून घ्या नंतर एका प्रेशर कुकरमध्ये मूग डाळ घाला. त्यात मीठ आणि पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या घेऊन शिजवा ज्यामुळे मूग डाळ मुलायम होईल. नंतर ही डाळ कुकरमध्ये मॅश करून घ्या.  त्यानंतर पाणी वेगळं करून ग्लासमध्ये काढून प्या. 

Web Title: Moong Dal Water Can Boost Your Weight Loss Journey : Moong Dal Water Is For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.