Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ओटी पोट सुटलंय? सकाळी गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; पोट आत जाईल-स्लिम दिसाल

ओटी पोट सुटलंय? सकाळी गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; पोट आत जाईल-स्लिम दिसाल

Morning Drink for Belly Fat at Home (Pot Kami Karnyasathi drink) : मेथी आणि बडीशेपेच्या बीया पचनासाठी चांगल्या असतात. पाण्यात भिजवल्यानंतर याचा कडूपणा निघून जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 06:17 PM2024-01-02T18:17:56+5:302024-01-02T18:28:26+5:30

Morning Drink for Belly Fat at Home (Pot Kami Karnyasathi drink) : मेथी आणि बडीशेपेच्या बीया पचनासाठी चांगल्या असतात. पाण्यात भिजवल्यानंतर याचा कडूपणा निघून जातो.

Morning Drink for Belly Fat at Home : Healthy Morning Drink To Lose Belly Fat Qucikly | ओटी पोट सुटलंय? सकाळी गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; पोट आत जाईल-स्लिम दिसाल

ओटी पोट सुटलंय? सकाळी गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; पोट आत जाईल-स्लिम दिसाल

शरीर एकदा लठ्ठ व्हायला लागलं की ते कमी करणं कठीण होतं. (Weight Loss Tips) महिनोंमहिने मेहनत केल्यानंतरही शरीर शेपमध्ये येत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही चांगला डाएट प्लॅन फॉलो करू शकता. (Belly Fat Loss Tips) जेणेकरून पोटाची चरबी कमी लागेल. सकाळी उठल्यानंतर घरगुती साहित्यापासून तयार केलेल खास लिक्विड वापरलं तर तुमचं वजन सहज कमी होईल. (How to loss Belly Fat Quickly) सतत बसून बसून ओटी पोट सुटू लागतं ते पोट एकदा सुटलं की कमीच होत नाही. अशावेळी व्यायाम आणि रोजचं रुटीन बदलण्याची  गरज असते. 

सकाळची सुरूवात साध्या पाण्याने करा. (Belly Fat Burner Morning Drinks to Lose Weight) तुम्ही साध्या पाण्याऐवजी मेथी आणि बडिशेपेच्या पाण्याचे सेवन करू शकता. रात्री १ ग्लास पाण्यात १ चमचा मेथी आणि बडिशेप भिजवून ठेवा. हे मिश्रण सकाळी गरम करून प्या. यामुळे पोट डिटॉक्स होण्यास मदत होईल. (Morning Drink for Belly Fat at Home)

वजन कमी करण्यासाठी सकाळी हे पाणी प्या. (Morning Weight Loss Water)

हे पाणी तयार करण्यासाठी सगल्यात आधी १ चमचा  बडीशेप, १ चमचा मेथीचे दाणे १ कप पाण्यात रात्रभर भिजवा.  सकाळी  हे पाणी गरम करा. त्यानंतर गाळून कोमट झाल्यानंतर या पाण्याचे सेवन करा. या पाण्याची चव तुम्हाला कडवट लागली तर त्यात मध मिसळून प्या.  मेथी आणि बडीशेपेच्या बीया पचनासाठी चांगल्या असतात. पाण्यात भिजवल्यानंतर याचा कडूपणा निघून जातो.

वेट लॉससाठी मेथीचे आणि बडिशेपेचं पाणी प्यायल्याचे फायदे (Fenugreek And Funnel Water Benefits)

फार्म इजी.इन च्या अहवालानुसार बडिशेपेचं पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासही मदत होते. जर तुम्ही १५ दिवस रोज हे पाणी प्यायलात तर शरीरात जमा झालेले हानीकारक पदार्थ बाहेर निघण्यास मदत होईल. या पाण्याने शरीर डिटॉक्स होते. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. याशिवाय रोज सकाळी मेथीचे पाणी प्यायल्याने शरीरही हेल्दी राहते.

कोण म्हणतं भात-चपाती खाल्ल्याने वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर जेवून बारीक होण्याचं सिक्रेट

मेथी आणि बडीशेप शरीरासाठी एंटी ऑक्सिडेंट्सप्रमाणे काम करते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स इम्यूनिटी बुस्टर असतात. हे पाणी प्याल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी मेथी आणि बडीशेपेचं पाणी उत्तम उपाय आहे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. एसिडीटी, ब्लोटींगची समस्या उद्भवत नाही.  या पाण्यामुळे वजन कमी  होणं ही सोपं होतं. लठ्ठपणा कमी होतो.  

हे डाएट फॉलो करा (Easy Diet For Weight Loss)

नाश्त्याला १ प्लेट फळं खा, फळांमध्ये सफरचंद, किव्ही, पपई या फळांचा समावेश करा. सकाळी ८ ते १० भिजवलेले बदाम खा. दुपारच्या जेवणात सॅलेड, ब्रोकोली, टोमॅटो, गाजर, काकडीचा समावेश करू शकता. सॅलेडमध्ये जराही मीठ घालू नका. संध्याकाच्यावेळी तुम्ही सूप पिऊ शकता. मिक्स भाज्यांचे सूप हिवाळ्यासाठी एक उत्तम आहार आहे. तुम्ही केवळ टोमॅटोचे सूपही घेऊ शकता.

Web Title: Morning Drink for Belly Fat at Home : Healthy Morning Drink To Lose Belly Fat Qucikly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.