Join us  

सकाळी उठल्या उठल्या नाश्त्याच्या आधी न चुकता खा १ गोष्ट, राहाल दिवसभर एनर्जेटीक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 12:41 PM

Morning Routine Do 1 thing before Breakfast without fail for Good Health : कामांची आणि आवरण्याची कितीही घाई असली तरी सकाळी उठल्यावर १ गोष्ट आवर्जून करायला हवी.

सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्या डोळ्यापुढे कामांची यादी असते. विशेषत: महिला तर डोळे उघडताच पाणीही न पिता घरातल्या कामांना सुरुवात करतात. नाश्ता काय करायचा, स्वयंपाक काय करायचा, एकीकडे चहा, दुसरीकडे मुलांचे आवरणे, साफसफाई अशा अनेक गोष्टी दोन हातांनी सुरू असतात. ऑफीसला वेळेत पोहोचायची घाई असल्याने अनेकदा काही जणी नाश्ता न करता केवळ चहा पिऊनच ऑफीसला जायला निघतात. ऑफीसला गेल्यावर कामाची घाई असल्याने मग कामातून ब्रेक मिळेल तेव्हाच आपण डबा खातो (Morning Routine Do 1 thing before Breakfast without fail for Good Health). 

पण असे करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. सकाळी उठल्यावर चहा पिण्याऐवजी ड्रायफ्रूट, दाणे या प्रकारातील काहीतरी आवर्जून खायला हवे. आहारतज्ज्ञ श्वेता शाह-पांचाळ याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देतात. सकाळी उठल्यावर वेळ नसतो अशी सबब न देता हे नटस खाणं आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी कसं उपयोगी असतं हेही त्या सांगतात. त्यामुळे नाश्ता करण्याआधी काही वेळ उठल्यावर रात्रभर पाण्यात भिजवलेले नटस आवर्जून खायला हवेत. कितीही घाईत असलात तरी उठल्यावर नटस खायलाच हवेत. तसेच नटस खाल्ले म्हणून आता ब्रेकफास्ट नको असेही करुन उपयोग नाही. तर त्यानंतर ठराविक वेळाने ब्रेकफास्टही करायलाच हवा.

(Image : Google)
 

१. पोषण मिळाल्याने एनर्जी टिकून राहते

नटसमध्ये फॅट आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसभर शरीरातील इन्शुलिनचे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे होते. सकाळीच शरीराला फॅटस आणि प्रोटीन मिळाल्याने एकप्रकारे एनर्जी येण्यास मदत होते.

२. गोड खाण्याची इच्छा नियंत्रणात

अनेकदा आपल्याला दिवसा दर काही वेळाने गोड खाण्याची इच्छा होते. मग आपण चॉकलेट, मिठाई, स्वीटस किंवा चहा-कॉफी असं काही ना काही घेतो. पण सकाळी नटस खाल्लेले असतील तर अशाप्रकारे सतत गोड खाण्याची इच्छा होत नाही. उत्तम आरोग्यासाठी हे फायद्याचे असते. 

३. पोटाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत 

पोट चांगलं असेल तर आपलं आरोग्य चांगलं असतं असे आपण म्हणतो. नटसमुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी न चुकता आधी नटस किंवा फळ खायला हवे. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यआहार योजनालाइफस्टाइलफिटनेस टिप्स