Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ना धड पोषण-ना धड आहार? घरोघरी महिला आजारी आहेत, ​​​​​​​पोषण कमतरतेनं पोखरले शरीर

ना धड पोषण-ना धड आहार? घरोघरी महिला आजारी आहेत, ​​​​​​​पोषण कमतरतेनं पोखरले शरीर

National Nutrition Week 2023 : ना जेवणाकडे लक्ष, ना पोषणाकडे -सगळ्या घरादाराची काळजी घेणाऱ्या महिलांना ‘पोषण’ आहार का मिळू नये? (राष्ट्रीय पोषण सप्ताह)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2023 06:07 PM2023-09-02T18:07:18+5:302023-09-02T18:47:09+5:30

National Nutrition Week 2023 : ना जेवणाकडे लक्ष, ना पोषणाकडे -सगळ्या घरादाराची काळजी घेणाऱ्या महिलांना ‘पोषण’ आहार का मिळू नये? (राष्ट्रीय पोषण सप्ताह)

National Nutrition Week 2023 : women and nutrition deficiency causes and symptoms | ना धड पोषण-ना धड आहार? घरोघरी महिला आजारी आहेत, ​​​​​​​पोषण कमतरतेनं पोखरले शरीर

ना धड पोषण-ना धड आहार? घरोघरी महिला आजारी आहेत, ​​​​​​​पोषण कमतरतेनं पोखरले शरीर

Highlightsआपण काय खातोय, याचा हिशेब करा. डायरीत रोज लिहा, आज काय खाल्लं..

- प्रिया परदेशी

माझं ना बाई सारखं डोकं दुखतं, कंबर धरते, खूप आळस येतो, फार चिडचिड होते. ही वाक्यं बायका येताजाता म्हणतात. ते काही रडगाणं नसतं, अनेकींचं खरंच हे सारं दुखणं असतंच. त्यात वजन वाढलं, पोट सुटलं, हे सगळे असतातच मागे लागलेले. त्यात बी १२ कमी, हिमोग्लोबिन कमी, व्हिटामिन डी कमी हे सारं असतंच. मात्र यासाऱ्यात बायका चुकून कधी आपल्यासाठी पोषण आहाराचा विचार करतात का? डाएटचा विचार करतात, डाएटही करतात पण पोषक आहार? पोषण? घरातल्या सगळ्यांच्या खाण्याची काळजी घेतील पण स्वत:च्या पोेणाचं काय? आपल्याला पोषण कमतरता म्हणजेच न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे हे कधीतरी बायकांच्या लक्षात येतं का? (National Nutrition Week 2023)

(Image : google)

बघा तुम्हालाही असं होतं का?

१. मधूनच खाण्याचं प्रचंड क्रेव्हिंग असतं. मिठाचे पदार्थ म्हणजे वेफर्स, चिप्स खावेसे वाटतात. मात्र त्याचा परिणाम असा होतो की ते जेवतच नाही. शरीरात प्रोटीनची कमतरता तयार होते.
२. जेवण झाल्यावर साखर किंवा गोड खावंसं वाटतं?
३. नाश्ता करतच नाही?
४. कोरडी भाजीपोळीच डब्यात नेता?
५. प्रोटीन आहारात अगदी कमी किंवा नाहीच?
६. आपली फिगर, वजन, त्वचेचा पोत हा सेलिब्रिटींसारखाच असं मनात असतं आणि ते नाही म्हणून तुम्ही स्वत:ला दोष देता?


(Image :g00gle)


हे सगळं गंभीर आहे असं वाटत नाही का?

१. सतत डाएट करत राहणंही काही हेल्दी नाही. फिटनेसचा, समतोल आहाराचा काहीच विचार न करता सतत फळं खाणं, सतत भाज्या उकडून खाणं, सतत सूप पिणं, म्हणजे उत्तम डाएट नाही. त्यानं शरीराचं पोषण काही होत नाही.
२. उलट रोज वरणभात, भाजीपोळी खाणं हे उत्तम डाएट. त्यानं शरीराचं पोषण होतं, पण डाएटच्या नावाखाली जो अतिरेक केला जातो त्यानं शरीराला फॅट्स मिळत नाहीत. त्यामुळे मेंदूतली रासायनिक प्रक्रियाही बाधित होते. व्हिटॅमिन्स मिळत नाहीत, त्यामुळे एकूण शारीरिक क्षमताही घटतेच. व्हिटॅमिन डी मिळत नाही. त्यामुळे हाडं ठिसूळ होतात.
३. बारीक दिसण्यासाठी स्वत:ला उपाशी ठेवलं जातं, हे कुपोषणच!
४. वेळ नाही म्हणून तुम्ही झटके पट जे खातात, त्यातून शरीराला काहीही मिळत नाही. हार्मोन्सची गडबड होते आणि आपल्या शरीराला घातक ठरते.
त्यामुळे आपण काय खातोय, याचा हिशेब करा. डायरीत रोज लिहा, आज काय खाल्लं..
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

Web Title: National Nutrition Week 2023 : women and nutrition deficiency causes and symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.