Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नवरात्र स्पेशल : येत्या ९ दिवसांत खा ‘या’ ४ पैकी १ पदार्थ! वाढेल फिटनेस-पोटही होईल कमी

नवरात्र स्पेशल : येत्या ९ दिवसांत खा ‘या’ ४ पैकी १ पदार्थ! वाढेल फिटनेस-पोटही होईल कमी

Navratri 2024: 12 Healthy dishes to add to your vrat feast; best for Weight loss : वजन कमी करण्यासाठी ९ दिवस काय खाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2024 04:49 PM2024-10-02T16:49:11+5:302024-10-02T19:36:07+5:30

Navratri 2024: 12 Healthy dishes to add to your vrat feast; best for Weight loss : वजन कमी करण्यासाठी ९ दिवस काय खाल?

Navratri 2024: 12 Healthy dishes to add to your vrat feast; best for Weight loss | नवरात्र स्पेशल : येत्या ९ दिवसांत खा ‘या’ ४ पैकी १ पदार्थ! वाढेल फिटनेस-पोटही होईल कमी

नवरात्र स्पेशल : येत्या ९ दिवसांत खा ‘या’ ४ पैकी १ पदार्थ! वाढेल फिटनेस-पोटही होईल कमी

आता काही दिवसात नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल (Navratri 2024). नऊ दिवस नऊ देवींचा जागर होईल. या ९ दिवसात काही महिला उपवासही धरतात. या ९ दिवसांमध्ये आपण उपवासाचे पदार्थ खातो (Weight loss). साबुदाणे, फळे, बटाटे आणि बरेच काही पदार्थ खातो (Fitness). पण उपवासाचे पदार्थ खाऊनही वजन वाढतं. बटाटे, तेलकट पदार्थ, गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं.

काही जण ९ दिवस फक्त फळे खातात. पण यामुळे शरीराला पुरेसं पोषण मिळेलच असे नाही. जर नवरात्रीमध्ये आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आहारात फळे, भाज्या आणि नटांचा समावेश करा. यामुळे शरीराला भरपूर उर्जा मिळेल. शिवाय वजनही घटवण्यास मदत होईल(Navratri 2024: 12 Healthy dishes to add to your vrat feast; best for Weight loss).

वजन कमी करण्यासाठी नवरात्रीमध्ये काय खावं?

फळे

वजन कमी करण्यासाठी आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करा. रोज सकाळी १ सफरचंद खा. यामुळे शरीराला उर्जा मिळेल. शिवाय केळी, पपई, पेरू, संत्री आणि द्राक्षे खा. ही फळे खाल्ल्याने शरीराला फायबर आणि भरपूर ऊर्जा मिळेल. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. शिवाय वेट लॉससाठीही मदत होईल.

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय

नारळ पाणी प्या

दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी सकाळी १ नारळ पाणी प्या. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल. आणि वेट लॉससाठीही मदत होईल. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. यामुळे शरीरात ऊर्जा येते आणि रिकाम्या पोटी गॅस, ॲसिडीटीचा त्रास होत नाही.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

सुका मेवा

उपवासादरम्यान, कार्य करण्यासाठी ताकद आणि उर्जाही लागते. जे ९ दिवस उपवास करतात, त्यांनी मुठभर सुकामेवा रोज खावा. सुका मेवा शरीराला ऊर्जा देईल आणि आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण करेल. उपवासात आपण काजू, बदाम, मनुका, अक्रोड आणि खजूर खाऊ शकता.

ताक आणि दही

उपवासाच्यावेळी आपण द्रवपदार्थाच्या सेवनाकडे अधिक लक्ष द्यावे. यासाठी आहारात दही आणि ताकाचा समावेश करा. दही खायला आवडत नसेल तर, आपण ताक किंवा लस्सी तयार करून पिऊ शकता. ताक बनवताना त्यात जिरे, रॉक मीठ घाला. यामुळे पचनक्रिया सुधारेल. 

Web Title: Navratri 2024: 12 Healthy dishes to add to your vrat feast; best for Weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.