नवरात्रीच्या दिवसांत (Navratri 2023) अनेकजण आवडीने ९ दिवस उपवास करतात. उपवास केला असेल किंवा नसेल तरीही अनेक उपवासाचे पदार्थ खाण्यात येतात. वजन वाढण्याच्या भितीने अनेकजण उपवास करणं टाळतात. योग्यवेळी योग्य पदार्थांचे सेवन केले तर तुम्ही वजन वाढ टाळू शकता याशिवाय लठ्ठपणाही वाढणार नाही. अनेकजण आहारात फळांचा समावेश करतात तर काहीजण साबुदाणा, वरीचा भात, शेंगाड्याची पुरी, रताळ्याच्या शीरा, शिंगाड्याचा हलवा, शेंगदाणे, मखाने, पनीरचे सेवन करतात.(Weight Loss fasting diet plan by nutritionist)
आरोग्याच्या दृष्टीने पाहायचं झालं तर हे अन्हेल्दी ठरू शकतं. आहारतज्ज्ञ करिश्मा यांच्यामध्ये फराळात साबुदाण्याची खिचडी खाणं अनेकदा हेवी होऊ शकतं. किंवा उकडलेले बटाटे, अरबीचे सेवन केले जाते. यात कॅलरीजचे प्रमाण डबल असते. म्हणून कमीत कमी प्रमाणात सेवन करा.
वाटीभर साबुदाण्याचे ५ मिनिटांत करा खमंग अप्पे, उपवासाची सोपी-खमंग रेसिपी, नक्की ट्राय करा
वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा?
१) सकाळी एक वाटी मलई नसलेलं दही खा. याबरोबर तुम्ही शिंगाड्याचा उपमा किंवा राजगिऱ्याची चपाती खाऊ शकता. याशिवाय कमी साखर आणि हाय फायबर्सयुक्त फळांचा आहारात समावेश करा. तुम्ही सफरचंद, पिअर आणि पपई खाऊ शकता.
२) दुपारच्यावेळी साबुदाण्याची खिचडी, शिंगाड्याची खिचडी खा. संध्याकाळी दही किंवा दूधाबरोबर नट्स, बदाम अखरोट किंवा शेंगदाणे खा. रात्रीच्यावेळी, रताळ्याचा शीरा हा उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही साखरेऐवजी गुळाच्या पावडरचा वापर करू शकता.
हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे
३) मधल्यावेळेत भूक लागली तर राजगिऱ्याचे लाडू, खारे शेंगदाणे, शेंगदाणा चिक्की, बटाट्याचे वेफर्स, केळ्याचे वेफर्स, फराळी चिवडा खा. संध्याकाळी (कमी गोड) चहा, कॉफी किंवा दूधाबरोबर फळं खा किंवा उपवासाचा चिवडा खा. दोन दिवसातून एकदा किंवा रोज सकाळी नारळपाणी प्या. दुधात काजू-बदाम घालून ते उकळून पिऊ शकता. यामुळे बराचवेळ पोट भरलेलं राहील.
वजन वाढू नये खास यासाठी टिप्स
१) कोणताही पदार्थ तेलात तळण्याऐवजी वाफेवर शिजवा.
२) साखरेऐवजी तुम्ही मध, गूळ, खजूर अशा इतर पर्यायांचा वापर करू शकता.
३) साबुदाणा, मखाना किंवा अरबी हाय कॅलरीज फूडमुळे वजन वाढू शकतं.
४) सुक्या मेव्याबरोबर फळांचा आहारात समावेश करा.
५) जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी पिण्याचा कंटाळा केला तर डिहायड्रेशन होऊ शकतं.