Join us  

नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक डाळिंब रोज खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, तज्ज्ञ सांगतात डाळिंबच आहे खरा फळांचा राजा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2022 5:01 PM

Benefits of Pomegranate: फळांचा राजा कोणता, असं विचारलं तर सगळेच जण अगदी सहज आंबा असं उत्तर देतील. पण तज्ज्ञ सांगतात फळांचा खरा राजा आहे डाळिंब. वाचा असं का म्हणतात?

ठळक मुद्देडाळिंबामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि बी हे मुबलक प्रमाणात असते. स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे सगळे घटक महत्त्वाचे आहेत.

मंजिरी कुलकर्णी, आहारतज्ज्ञलालचुटूक डाळिंबाचे दाणे (pomegranate) दिसले की सहज कोणालाही खावे वाटतात. आयते दाणे समोर दिसले की संपतातही चटकन. पण डाळिंब खाण्यातली सगळ्यात मुख्य अडचण तेव्हाच येते जेव्हा ते डाळिंब सोलावे लागतात. डाळिंब सोलून मग ते खाणं अनेकांना जिवावर येतं. त्यामुळे मग बरेच जण डाळिंब खाणंच टाळतात. पण डाळिंबामध्ये जबरदस्त पौष्टिक घटक (Benefits of eating pomegranate) असून नियमितपणे डाळिंब खाणं अतिशय गरजेचं आहे. 

 

डाळिंब हे असे फळ आहे की जे सगळीकडे अगदी सहज उपलब्ध असते. शिवाय त्याची किंमतही सर्वसामान्यांना परवडण्यासारखी असते.

निरोगी हृदयासाठी सोपा मंत्र, तज्ज्ञ सांगतात करा ५ सोप्या गोष्टी आणि हृदय जपा

डाळिंब असे फळ आहे, की जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी सहज चालण्यासारखे आहेत. डाळिंबामध्ये असणारे पौष्टिक घटक वय वाढण्याची प्रक्रिया मंद करतात. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी डाळिंब खावे ( pomegranate is helpful for reducing aging). आयुर्वेदानुसार डाळिंब हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम फळ मानले गेले आहे.

 

डाळिंब खाण्याचे फायदे(Benefits of eating pomegranate)१. डाळिंबामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि बी हे मुबलक प्रमाणात असते. स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे सगळे घटक महत्त्वाचे आहेत.

बाणेदार आजी म्हणते, मला नको सरकारचे उपकार आणि मेहरबानी.. कारण..२. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. ३. मोठ्या आजारामुळे झालेली शारिरीक हानी भरून येण्यासाठी डाळिंब उपयुक्त ठरते.४. मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.५. पचनशक्ती वाढविण्यासाठी डाळिंबाचा उपयोग होतो. 

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.) 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सफळे