Join us

नवरात्र स्पेशल पदार्थ: खूप अशक्तपणा वाटतो? अंगात ताकदच नाही? खा सातूचे पीठ- फायदे ५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2022 17:01 IST

Benefits of Eating Satuche Pith: प्रत्येक महिलेने नियमितपणे खायलाच पाहिजे, असा आणखी एक आरोग्यदायी पदार्थ- सातूचे पीठ

ठळक मुद्दे९ दिवसांच्या उपवासानंतर येणारा अशक्तपणा, थकवा घालविण्यासाठीही सातूचे पीठ अतिशय उपयुक्त ठरेल.

मंजिरी कुलकर्णी, आहारतज्ज्ञनुकतेच कोरोना किंवा कोविड या महाभयंकर आजाराचे मोठे संकट सगळ्यांवर येऊन गेले. काही जणांना कोविड होऊन गेल्यानंतर थकवा, अशक्तपणा (weakness) किंवा इतर वेगवेगळे शारिरीक त्रास पुढचे अनेक दिवस जाणवत होते. कोविड किंवा इतर कोणत्याही मोठ्या आजारातून उठल्यानंतर झालेली शारिरीक हानी (how to recover health?) लवकरात लवकर भरून येण्यासाठी सातुचे पीठ अतिशय उपयुक्त ठरते. हा एक पारंपरिक पदार्थ  (satuche pith- traditional food) तर आहेच, शिवाय पचायला देखील अतिशय सोपा आहे. ९ दिवसांच्या उपवासानंतर येणारा अशक्तपणा, थकवा घालविण्यासाठीही सातूचे पीठ अतिशय उपयुक्त ठरेल.

 

सातूचे पीठ खाण्याचे फायदे १. सातूचे पीठ सकाळ- संध्याकाळ सेवन केले असता १५ दिवसांतच अशक्तपणा जाऊन तरतरी येते.

२. हा एक पदार्थ असा आहे, जो अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना चालू शकतो.

नवरात्र स्पेशल: देवीसाठी तांबुल करायचा? २ सोप्या रेसिपी, तांबुलही रंगेल छान..

३. सातुच्या पिठामध्ये पचायला हलके असणारे प्रोटिन्स, कार्ब्स असतात. 

४. सातुचे पीठ खाल्ल्यानंतर पोटात शांत वाटते.

५. या पदार्थात फॅट्स नसतात. त्यामुळे वेटलॉस करणारेही ते खाऊ शकतात.

 

सातुचे पीठ कसे करायचेसाहित्यअर्धा किलो गहूपाव किलो चना डाळ

नवरात्री स्पेशल: करा उपवासाचा कुरकुरीत मसाला डोसा, शेफ कुणाल कपूर यांची चविष्ट- सोपी रेसिपीपाव किलो डाळवंअर्धी वाटी जिरे१ जायफळ

रेसिपी१. जायफळ आणि डाळवं सोडून इतर सर्व पदार्थ मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत आणि बारीक दळून आणावे.

२. हे पीठ पाण्यात किंवा दूधात कालवून त्याची पेस्ट करावी, चिमूटभर मीठ आणि चवीपुरता गूळ घालावा आणि दररोज १ वाटी खावे. मधुमेहींनी गूळ टाकणे टाळावे. 

३. सातूच्या पिठाचा उपमा, पराठे, थालीपीठसुद्धा बनवू शकता. करताना त्यामध्ये दही, भाज्या घातल्या तर त्याची गुणवत्ता आणखी वाढते.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.) 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स