बाळंतपणा नंतर अगदी कमी वेळातच 'फॅट टू फिट' होणाऱ्या बऱ्याच अभिनेत्रींपैकीच नेहा धुपिया (Neha Dhupia) एक. खरंतर, प्रेग्नन्सीनंतर वाढलेलं वजन आटोक्यात आणणे म्हणजे प्रत्येक स्त्री पुढे मोठा गहन प्रश्नच असतो. मग प्रेग्नंन्सीत वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजणी आपापल्या परीने खूप मेहेनत घेतात. यात काहीजणींचे वजन अगदी (Neha Dhupia Weight Loss After Pregnancy) झटकन कमी होते तर काहींना फार प्रयत्न करावे लागतात. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट, एक्सरसाइज, जिम, योगा असे सगळे उपाय करुन पाहिले जातात(Neha Dhupia's Weight Loss Journey).
अभिनेत्री नेहा धुपियाने एका मुलाखतीत प्रसूतीनंतर वजन वाढल्यानंतरचा तिचा अनुभव सांगितला. पहिल्या मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे १७ किलो वजन वाढले होते. परंतु दुसऱ्या डिलिव्हरी नंतर म्हणजेच मुलाच्या जन्मानंतर तिचे वजन २३ किलोने (Neha Dhupia talks about her postpartum weight loss journey) वाढले होते. तेव्हा नेहाने आरोग्याकडे लक्ष दिले आणि वजन कमी केले. तिच्या या वजन कमी करण्याच्या प्रवासांत तिने डाएट, एक्सरसाइज अशा अनेक गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळल्या. यासोबतच वजन कमी करण्यासाठी ती बडीशेपचे पाणी देखील पीत होती. बडीशेपचे पाणी पिऊन तिने प्रेग्नंन्सी नंतर वाढलेले तब्बल २३ किलो वजन कमी केलं आहे. वजन कमी करण्यासाठी नेहाने नेमकं काय काय केलं आणि बडीशेपच्या पाण्याचा तिला वजन कमी करण्यासाठी कसा उपयोग झाला, यासोबतच हे बडिशेपचे पाणी कसे तयार करायचे ते पाहूयात.
नेहा धुपियाने असं केलं वजन कमी...
१. योग्य आहार :- नेहाने वजन कमी करण्यासाठी कॅलोरी डेफिशिएट डाएटचा वापर केला नाही. कारण तिला मुलांची काळजी घेण्यासाठी आणि कामासाठी आवश्यक असलेली एनर्जी राखून ठेवणे आवश्यक होती. तिने आपल्या आहारातून साखर, ग्लूटेन, आणि तळलेले अन्नपदार्थ वगळले आणि संतुलित आहार घेण्यावर अधिक जास्त भर दिला. तिच्या डाएटमध्ये अधिक फळे, भाज्या, आणि प्रोटीन यांचा समावेश होता, ज्यामुळे तिला वजन कमी करण्यात मदत झाली. संतुलित आहारामुळे तिच्या शरीराला आवश्यक पोषण मिळाले आणि अनावश्यक कॅलरीज कमी झाल्या. आहारात सुधारणा करण्यासोबतच नेहाने खाण्याच्या वेळेतही बदल केले. तिने सकाळी आणि संध्याकाळी जेवणाची ठरलेली एक वेळ निश्चित केली आणि १४ तासांच्या इंटरमेडिएट डायट फॉलो केले. या पद्धतीमुळे तिच्या शरीराला आवश्यक पोषण मिळाले आणि अतिरिक्त कॅलरीज शरीरात जमा होण्यास प्रतिबंध झाला. डायटमुळे तिच्या मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा झाली आणि वजन कमी करण्यात मदत झाली.
वजन कमी करताना चेहऱ्यावरची चमक गायब? ऋजुता दिवेकरांच्या ३ टिप्स- चेहऱ्यावर ग्लो हवा तर...
२. एक्सरसाइज वर अधिक भर :- नेहाच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात व्यायाम महत्वाचा भाग होता. जिममध्ये जाण्याऐवजी तिने रनिंग आणि योगा करणे अधिक पसंत केले. तिला जिमपेक्षा रनिंग अधिक आवडते, म्हणून तिने रनिंग हा तिच्या फिटनेस रूटीनचा भाग बनवला. रनिंग आणि योगा यामुळे तिच्या शरीराच्या ताकदीत आणि सहनशीलतेत सुधारणा झाली. या व्यायामामुळे तिला शारीरिकदृष्ट्या चांगले वाटू लागले आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही फायदेशीर ठरले.
३. बडीशेपचे पाणी :- नेहा हिने वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइजसोबतच बडीशेपचे पाणी देखील पीत असल्याचे सांगितले. प्रेग्नंन्सीनंतर वाढलेल वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. बडीशेपचे पाणी तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात १०० ते २०० ml पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून बडीशेप घालावी. आता हे भांड रात्रभरासाठी झाकून ठेवावे. सकाळी उठून गाळणीने हे पाणी गाळून बडीशेप बाजूला काढून घ्यावी. आता हे पाणी सकाळी पिऊन दिवसाची सुरुवात करावी यामुळे वजन कमी होण्यास अधिक मदत मिळते.
दरवर्षी ठरवता वजन कमी करु पण होतच नाही? यंदा वजन नक्की होईल कमी-वाचा ७ टिप्स...
हिवाळ्यात तूप खाल्लं म्हणून खरंच वजन वाढत का ? बघा एक्स्पर्ट सांगतात यामागचं खरं कारण...
वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी फायदेशीर...
बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम सारखे घटक मुबलक प्रमाणात असतात. यासाठीच बडीशेप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. बडीशेपचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची तक्रार नाहीशी होते. बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढतो. खरं तर बडीशेप ५ ते ६ तास भिजवून ठेवल्याने त्यातील पोषक तत्वे पाण्यात मिसळली जातात ज्यामुळे शरीराला फायदा होतो.