Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नया है यह! कोरियन डाएटची आहे जगभर चर्चा. काय आहे कोरियन डाएटचा वेटलॉस मंत्र?

नया है यह! कोरियन डाएटची आहे जगभर चर्चा. काय आहे कोरियन डाएटचा वेटलॉस मंत्र?

कोरियन डाएट वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे. कारण ही डाएट पध्दत नवीन , बाहेरच्या परदेशी पदार्थांना, भाज्यांना, फळांना महत्त्व देत नाही. तर स्थानिक आणि पारंपारिक भाज्या, फळं आणि पदार्थांना महत्त्व देऊन त्यांचा समावेश आहारात नियोजनबध्द पध्दतीने करण्याचा सल्ला देते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 08:21 PM2021-09-06T20:21:50+5:302021-09-06T20:25:41+5:30

कोरियन डाएट वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे. कारण ही डाएट पध्दत नवीन , बाहेरच्या परदेशी पदार्थांना, भाज्यांना, फळांना महत्त्व देत नाही. तर स्थानिक आणि पारंपारिक भाज्या, फळं आणि पदार्थांना महत्त्व देऊन त्यांचा समावेश आहारात नियोजनबध्द पध्दतीने करण्याचा सल्ला देते.

This is new! The Korean diet is the talk of the world. What is the weight loss mantra of Korean diet? | नया है यह! कोरियन डाएटची आहे जगभर चर्चा. काय आहे कोरियन डाएटचा वेटलॉस मंत्र?

नया है यह! कोरियन डाएटची आहे जगभर चर्चा. काय आहे कोरियन डाएटचा वेटलॉस मंत्र?

Highlightsकोरियन डाएटमधे गहू, डेअरी उत्पादनं, रिफाइंड साखर, अति चरबीयुक्त पदार्थ या घटकांना वज्र्य केलं जातं.कोरियन डाएटचे नियम पाळून वजन कमी करायचं असेल तर आधी चरबीयुक्त पदार्थांचं सेवन बंद करावं लागतं.डाएटसोबत नियमित व्यायामालाही या कोरियन डाएट पध्दतीमधे महत्त्व आहे.छायाचित्रं- गुगल

 वेटलॉससाठी डाएटचा पर्याय अनेकजण स्वीकारतात. अमूक एक डाएट फॉलो करुन वजन घटवण्याचा प्रयत्न केला जातो. पण प्रत्येक डाएट हे शास्त्राच्या आधारावरच असेल असं मात्र नाही . त्यामुळे अनेक डाएट फेल होतात, तर काही डाएट इतके निरस असतात की ते दीर्घकाळपर्यंत अर्थात थोडे परिणाम दिसेपर्यंत देखील पाळले जात नाही. पण डाएटच्या बाबत सध्या कोरियन डाएटची खूप चर्चा होते आहे. कोरियन डाएट हे वजन कमी करण्यासाठी परिणामकारक मानले जात आहे. कोरियन डाएट म्हणजे विशिष्ट आहारपध्दती पाळण्याच्या नियमांवर भर देते.

छायाचित्र- गुगल

काय आहे कोरियन डाएट?

कोरियन डाएट वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे. कारण ही डाएट पध्दत नवीन , बाहेरच्या परदेशी पदार्थांना, भाज्यांना, फळांना महत्त्व देत नाही. तर स्थानिक आणि पारंपारिक भाज्या, फळं आणि पदार्थांना महत्त्व देऊन त्यांचा समावेश आहारात नियोजनबध्द पध्दतीने करण्याचा सल्ला देते.
 कोरियन डाएटमधे गहू, डेअरी उत्पादनं, रिफाइंड साखर, अति चरबीयुक्त पदार्थ या घटकांना वर्ज्य केलं जातं. जास्तीत जास्त भाज्या आणि भात यांचा समावेश आहारात केला जतो.

छायाचित्र- गुगल

कोरियन डाएटचे नियम काय?

1. कोरियन डाएटमधे खाण्याचं प्रमाण आणि कॅलरीज याचं काही विशिष्ट गणित मांडलेलं नाही. पण ही डाएट पध्दती कमी कॅलरीयुक्त आहार घेण्याचा आग्रह धरते. त्यामुळे भाज्या, सूप , स्ट्यू यांना या आहारात विशेष स्थान आहे.
2. कोरियन डाएटमधे मधे मधेखात राहाणं अर्थातच स्नॅकिंगला, चटपटीत पदार्थ खाण्याला परवानगी नाही. चरबीयुक्त पदार्थ, डेअरीची उत्पादनं यांचं सेवन न करणे किंवा अगदी कमी प्रमाणात करणे हा या डाएटचा नियम आहे. स्नॅकिंगमुळे शरीरातील साखरेचं प्रमाण बिघडतं, त्यामुळे वजन वाढण्यास बळ मिळतं. कोरियन डाएटमधे मधून मधून सारखं खात राहाणं हे अनावश्यक आणि तोट्याचं मानलं जातं.
3. कोरियन डाएटचे नियम पाळून वजन कमी करायचं असेल तर आधी चरबीयुक्त पदार्थांचं सेवन बंद करावं लागतं. अतीप्रमाणात सॉसेस, तेल आणि सीजनिंग ( सलाडवर वरुन तेल घालणं) यावर बंधनं घालावे लागतात.
3. सोडायुक्त पेयं, बिस्कीटं, केक, मिठाया, आइस्क्रीम यांच्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं. म्हणून हे पदार्थ टाळून ताजी हंगामी फळं खाण्याला या डाएटमधे प्राधान्य दिलं जातं.
4. डाएटसोबत नियमित व्यायामालाही या कोरियन डाएट पध्दतीमधे महत्त्व आहे. नियमित व्यायाम असेल तरच आहाराचे नियम पाळून वजन लवकर कमी होईल असं ही आहार पध्दती म्हणते. पॉप वर्क आउट ( गाण्यांवर व्यायाम करण्याची विशिष्ट व्यायाम पध्दती) हा व्यायाम वजन कमी करण्यासाठी योग्य म्हटलेला आहे.

Web Title: This is new! The Korean diet is the talk of the world. What is the weight loss mantra of Korean diet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.