Join us  

आजी झालेल्या नीता अंबानी फिटनेससाठी रोज खातात ' हा ' पदार्थ, दिसतात फ्रेश आणि तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2024 2:18 PM

Nita Ambani's Diet Plan: From Breakfast To Dinner, Here's What Mukesh Ambani's Wife Eats And Drinks : नीता अंबानी स्वतःला फिट ठेवण्यासाठी खातात 'हा' पदार्थ' ज्यामुळे शरीर फिट आणि स्किन ग्लो करते..

भारतातील सर्वात श्रीमंत जोडपं म्हणून उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांची ओळख आहे. नुकतेच मुकेश अंबानी यांच्या मुलाचे थाटामाटात लग्न पार पडले (Healthy Routine). या सर्वच धामधुमीत एका व्यक्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले (Fitness). ती  व्यक्ती म्हणजे अर्थात नीता अंबानी. त्यांचं फिटनेस आणि चेहऱ्यावरचे टवटवीत तेज पाहून, त्या साठ वर्षांच्या आहेत, असं वाटणार नाही (Weight Loss).

मात्र, साठीत त्या इतक्या फिट कशा? असा प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आला असेल. तरुण वर्गाला लाजवेल असं त्यांच्या फिटनेस मागचं रहस्य काय? पाहा(Nita Ambani's Diet Plan: From Breakfast To Dinner, Here's What Mukesh Ambani's Wife Eats And Drinks).

नीता अंबानी यांचे साधं - सिंपल फिटनेस रुटीन

६० वर्षांच्या होऊनही नीता अंबानी फिटनेसमुळे अजूनही यंग आणि चार्मिंग दिसतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नीता यांचे वजन मुलांना जन्म दिल्यानंतर वाढले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःला फिट ठेवण्यासाठी स्किन, व्यायाम आणि डाएटला काटेकोरपणे फॉलो केलं.

लिंबू पाणीने करतात दिवसाची सुरुवात

सकाळी लवकर उठून त्या आधी ४० मिनिटे व्यायाम करतात. योग, जिम, कार्डीओ किंवा एरोबिक्स आणि झुंबासारखे व्यायाम करून स्वतःला फिट ठेवतात. याशिवाय कोमट पाण्यात लिंबू पिळून पितात. यातून शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. ज्यामुळे इम्युनिटी बुस्ट होते.

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

हेल्दी नाश्ताने करतात दिवसाची सुरुवात

व्यायाम केल्यानंतर त्या हेल्दी नाश्ता करतात. नीता अंबानी रोज सकाळी बीटरूट ज्यूस पितात. बीटरूटचा रस रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि स्टॅमिना वाढविण्यास मदत करतो. याशिवाय ड्रायफ्रुट्स, चहाऐवजी ज्यूस आणि ग्रीन टी पितात.

नीता अंबानी यांचा सिंपल डाएट प्लॅन

नीता अंबानी फास्ट फूड खाणं पूर्णपणे टाळतात. नीता यांना सूप, हिरव्या भाज्यांसोबतच गुजराती पदार्थही खायला आवडतं. त्या प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जसे की बीटरूट, नट्स आणि पीनट बटर इत्यादी सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असलेले अन्न खातात. हलके पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. ज्यामुळे त्यांची स्किन ग्लो करते.

जिमसाठी वेळ नाही - तोंडावरचा ताबा सुटतो? फक्त 'एवढ्या' वेळासाठी वॉक करा; वजन वाढणार नाही याची ग्यारंटी

त्यांच्या जवळ कायम पाण्याची बॉटल असते. वेळोवेळी पाणी पिऊन त्या स्वतःला हायड्रेट ठेवतात. त्यांना रात्रीच्या जेवणात अतिशय साधे पदार्थ खायला आवडतात. ते रात्री डाळ आणि चपाती खातात.

टॅग्स :नीता अंबानीवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स