Join us  

वाढत्या वजनावर कंट्रोल नाही? बाबा रामदेव सांगतात खा ३ पदार्थ; थुलथुलीत पोट - मांड्याही होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2024 1:41 PM

No control over weight gain? Baba Ramdev says eat 3 foods; best for weight loss : वाढत्या वजनावर ३ असरदार उपाय; वजन घटणारच

व्यस्त जीवनशैलीचा फटका सध्या सर्वांनाच बसत आहे (Weight Loss). कोणाचे केस गळत आहेत. तर कुणी लठ्ठपणाने त्रस्त आहे. मुख्य म्हणजे वजन वाढत जाते. बैठी काम, उलट सुलट पदार्थ खाणे, यामुळे वजन झपाट्याने वाढते आणि लवकर कमी देखील होत  नाही (Baba Ramdev). वजन कमी करणं काहींसाठी अवघड काम (Fitness). डाएट, व्यायाम करूनही जर वजन कमी होत नसेल तर, आहारात काही बदल करून पाहा.

याबद्दलची माहिती योगगुरु रामदेव बाबांनी दिली आहे. आपल्या डाएट प्लॅनमध्ये या तीन गोष्टींचा समावेश केल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. कोणते आहेत ते तीन पदार्थ पाहुयात(No control over weight gain? Baba Ramdev says eat 3 foods; best for weight loss).

वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

दलिया

दलिया खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दलिया गहू, ज्वारी, बाजरी, मूग डाळ, तांदूळ यांचे मिश्रण करून लापशी तयार करण्यात येते. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फोलेट, पोटॅशियम, कार्बोहाइट्रेड, झिंक, मिनिरल्स, विटॅमिन्स, आयर्न, प्रोटीन, फाइबर अशी बरीच पोषक तत्वे असतात. ज्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. दलिया आपण आपल्या आवडीनुसार गोड किंवा चमचमीतही बनवू शकता.

बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट

दुधी भोपळ्याचा रस

दुधी भोपळ्याची भाजी लोक नाक मुरडत खात जरी असले तरी, याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असतं. दुधी आहारात घेतल्याने हाडं मजबूत होतात. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, दुधी भोपळ्याचा रस प्या. हा रस प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय शरीराला आवश्यक पोषक तत्वेही मिळतात.

अश्वगंधाची पानं चावून खा

व्यायामाला वेळ नाही - तोंडाचाही ताबा सुटतो? ४ स्मार्ट गोष्टी करा; दिसाल सुडौल - राहाल कायम फिट

बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, 'अश्वगंधाची पानं नियमित खाल्ल्याने महिनाभरात फरक आपल्याला दिसून येईल. अश्वगंधाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे चयापचय बुस्ट होते, आणि पचनक्रिया सुधारते. जे खाल्ल्याने वजनही झरझर कमी होते. आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ या तिन्ही वेळेस पानं चघळून खाऊ शकता. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य