Join us  

ना रनिंग - ना जिम, आर. माधवन झाला सुपरफिट, पाहा त्यानं कसं घटवलं २१ दिवसात वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 2:55 PM

No gym, no running: R Madhavan shares his weight-loss method : व्यायामाशिवाय वजन घटवणं सोपं आहे? आर माधवन म्हणतो, डाएटमध्ये..

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय, साऊथ आणि बॉलीवूडमध्ये असंख्य चित्रपटात काम करणारा आर. माधवन (R. Madhavan) याचा चाहतावर्ग फार मोठा आहे (Weight loss). वयाच्या ५४व्या वर्षीही माधवन फिट आणि तरुण दिसतो. अलीकडेच माधवनने 'शैतान' या चित्रपटात व्हीलेनची भूमिका साकारली होती (Fitness). या चित्रपटातील लूकमुळे माधवन प्रचंड चर्चेत आला होता. त्या आधी रॉकेटरी द नंबी इफेक्ट (Rocketry : The Nambi effect)

या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका आणि दिग्दर्शनही केलं होतं. या चित्रपटातील भुमिकेसाठी माधवनने विशेष मेहनत घेतली. वजन वाढवल्यानंतर, २१ दिवसात वजन घटवलं सुद्धा होतं. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांना माधवनच्या वेट लॉसचा फंडा जाणून घ्यायचा होता. वजन कमी करण्यासाठी आर माधवनने नक्की कोणत्या टिप्स फॉलो केल्या? याची माहिती त्याने एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे(No gym, no running: R Madhavan shares his weight-loss method).

आर माधवनचा दिनक्रम

आर माधवनने एका मुलाखतीत २१ दिवसात वजन कमी केलं असल्याचं सांगितलं. वेट लॉससाठी आर माधवनने सॉलिड डाएटऐवजी लिक्विड डाएटवर फोकस ठेवला. याव्यतिरिक्त माधवन ६ : ४५ वाजता डिनर करतात. शिवाय जंक फूड आणि पॅक्ड फूड पूर्णपणे टाळलं. ज्यामुळे २१ दिवसात वजन कमी करणं सोपे झाले. 

वयात अंतर मोठं पण संसार सुखाचा! पाहा सेलिब्रिटी कपल ज्यांच्या नात्यात ‘वय’ आलं नाही, उलट..

हेल्दी रुटीनमुळे वजन घटते

लठ्ठपणापासून सुटका मिळवण्यासाठी हेल्दी रुटीन फॉलो करा. आर माधवनने वेट लॉसबद्दल फास्टिंग उपयुक्त ठरत असल्याचं सांगितलं. सारखं उलट सुलट पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे अधूमधून फास्टिंग करण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे.

जान्हवी कपूरला फूड पॉयझनिंग-दवाखान्यात ॲडमिट, पावसाळ्यात हमखास होणारा फूड पॉयझनिंगचा धोका ‘असा’ टाळा

वजन कमी करण्यासाठी आर माधवनने फॉलो केले काही रुल्स

वेट लॉससाठी आर माधवनने इंटरमिटेंट फास्टिंग, ४५ ते ६० वेळा अन्न चघळणे, सकाळी वॉक, डिनर साडे सातच्या आत करणे, भरपूर लिक्विड डाएट, हिरव्या भाज्या, सहज पचणारे आणि हेल्दी पदार्थ खाणे. या काही लहान सहान बदल केल्याने वेट लॉस करणं सोपं होतं. असं सांगितलं. या गोष्टींमुळे रनिंग, जॉगिंग किंवा जिमशिवाय आर माधवनचे वजन कमी झालं.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स