Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मसाबा गुप्ताचं 'नो शुगर डाएट', कसं जमवलं तिने- नेमके काय फायदे झाले? बघा तिची व्हायरल पोस्ट..

मसाबा गुप्ताचं 'नो शुगर डाएट', कसं जमवलं तिने- नेमके काय फायदे झाले? बघा तिची व्हायरल पोस्ट..

Masaba Gupta's No Sugar diet: मसाबा गुप्ताने मागच्या २१ दिवसांपासून गोड पदार्थ खाणं पुर्णपणे बंद केलं आहे.. बघा कसं जमवलं तिने हे आणि नेमके काय फायदे झाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 06:02 PM2023-01-19T18:02:17+5:302023-01-19T18:03:13+5:30

Masaba Gupta's No Sugar diet: मसाबा गुप्ताने मागच्या २१ दिवसांपासून गोड पदार्थ खाणं पुर्णपणे बंद केलं आहे.. बघा कसं जमवलं तिने हे आणि नेमके काय फायदे झाले...

No Sugar diet of Masaba Gupta, How she did such diet? Benefits of no sugar diet, How to control sugar- Tips by Masaba Gupta | मसाबा गुप्ताचं 'नो शुगर डाएट', कसं जमवलं तिने- नेमके काय फायदे झाले? बघा तिची व्हायरल पोस्ट..

मसाबा गुप्ताचं 'नो शुगर डाएट', कसं जमवलं तिने- नेमके काय फायदे झाले? बघा तिची व्हायरल पोस्ट..

Highlights'नो शुगर डाएट'चे खूपच चांगले फायदे आता २१ दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत, असं ती म्हणते.

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची लेक म्हणजे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर  मसाबा गुप्ता (Masaba Gupta). तिच्या फिटनेसबाबत तर ती ओळखली जातेच. डाएट- व्यायाम या सगळ्याच गोष्टींमध्ये ती अगदी परफेक्ट असते आणि सहसा रोजचं रुटीन काहीही असलं तरी तिच्या या वेळा कधी चुकत नाहीत. किंवा व्यायामाच्या शेड्यूलमध्ये फारसा बदल होत नाही. इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही ती तिच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेसासाठी प्रोत्साहन देत असते. आता तिने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती आणि त्यात तिने तिच्या 'नो शुगर डाएट' (Benefits of no sugar diet) बाबत माहिती दिली होती.

कसं केलं मसाबाने नो शुगर डाएट?
मसाबा गुप्ता मागच्या काही दिवसांपासून नो शुगर डाएटवर आहे. या डाएटचे तिने नुकतेच २१ दिवस पुर्ण केले आहेत. नावावरूनच लक्षात येत आहे की या डाएटदरम्यान तिने साखर खाणं पुर्णपणे बंद केलं होतं.

फरशी पुसण्याच्या पाण्यात टाका १ खास पदार्थ, फरशा होतील चमकदार आणि मुंग्याही होतील कमी

पोस्ट शेअर करताना तिने आवर्जून उल्लेख केला आहे की या डाएटदरम्यान तिने ॲडेड शुगर, शुगर फ्री असंही पुर्णपणे बंद केलं होतं. कोणताही गोड पदार्थ खाणं तिने टाळलं. ती म्हणते की सुरुवातीला खूप त्रास झाला. डाएटच्या मधल्या काळातले दिवस तर खूपच कठीण गेले. केक तर तिला खूप खावासा वाटत होता. पण तरीही तिने संयम सुटू दिला नाही. याचे खूपच चांगले फायदे आता २१ दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत, असं ती म्हणते.

 

साखर बंद केल्यामुळे मसाबाला झालेले फायदे
१. मेंदूचं कार्य अधिक चांगल्या पद्धतीने होत आहे, असं जाणवलं.

मुलांचा कॉन्फिडन्स घालवणाऱ्या ५ गोष्टी, बघा पालकांच्या कोणत्या वाक्याचा मुलांवर कसा परिणाम होत जातो....

२. काम करताना एकाग्रता वाढली.

३. रोजचं वर्कआऊट करताना अधिक उर्जादायी वाटतं.

 

४. त्वचा नेहमीपेक्षा खूप चांगली वाटू लागली

५. मुडस्विंग्स कमी झाले.

शिजवण्याआधी प्रत्येक डाळ भिजत घालावी, कारण.... वाचा त्यामुळे आरोग्याला होणारे ३ जबरदस्त फायदे

६. वजन एका ठराविक प्रमाणात कमी होत आहे, असं जाणवलं.

७. ॲन्झायटीही कमी झाल्यासारखी वाटली. 

 

 

Web Title: No Sugar diet of Masaba Gupta, How she did such diet? Benefits of no sugar diet, How to control sugar- Tips by Masaba Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.