Join us  

वेट लॉसमुळे गोड खाणं टाळताय? ड्रायफ्रूटसचे करा तोंडात विरघळणारे पौष्टिक लाडू; स्कीनही होईल तुकतुकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2024 7:38 PM

No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Laddu Recipe for weight loss : 'हा' १ लाडू रोज खा; वेट लॉससाठी होईल मदत

वजन कमी करणे सोपे नाही. यासाठी व्यायाम आणि डाएटकडे विशेष लक्ष द्यायला हवे (Weight loss recipe). वेट लॉस करताना आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होतेच. पण यामुळे आपलं वजन वाढतं (Dryfruits Laddu). वजन कमी करण्यासाठी आपण मिठाई खाणंही सोडतो. पण गोड खाण्याची सवय काही सुटत नाही (Fitness). गोड पदार्थ खाल्ल्यानेही वजन वाढतं आणि ब्लड प्रेशरही वाढतं.

जर आपल्याला वजन कमी करायचं असेल आणि गोड खाण्याची इच्छा होत असेल तर, ड्रायफ्रूटसचे पौष्टिक लाडू करून खा. ड्रायफ्रूटसचे लाडू आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यासह वेट लॉसही होते. मुख्य म्हणजे गोड खाण्याची इच्छा कमी होते. सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी आपण ड्रायफ्रूटसचे लाडू तयार करून खाऊ शकता(No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Laddu Recipe for weight loss).

वेट लॉस ड्रायफ्रूटस लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

ओवा

बडीशेप

खसखस

मखाणा

काळी मिरी

बदाम

काजू

भोपळ्याचे दाणे

तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा परफेक्ट फॉर्म्युला; दिवसभरात कधी - काय खावं पाहा; वजन घटेल

मगज बिया

चणे

तूप

बेसन

मनुके

कृती

ड्रायफ्रूटस लाडू करण्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ओवा, बडीशेप, खसखस, मखाणा, काळी मिरी, बदाम, काजू, भोपळ्याचे दाणे, आणि मगज बिया घालून सर्व साहित्य भाजून घ्या.

भाजून घेतलेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची पावडर तयार करा. तयार पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

घरचे जेवण नको म्हणत मुलं नखरे करतात? ३ जबरदस्त ट्रिक्स; मुलं बाहेरचं खाणं टाळतील

नंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले चणे घालून पावडर तयार करा. दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात वाटीभर बेसन घालून भाजून घ्या. त्यात तयार ड्रायफ्रूटसची पावडर आणि चणा डाळ पावडर घालून सर्व साहित्य एकजीव करा. त्यात मनुके देखील आपण घालू शकता. साहित्य एकजीव झाल्यानंतर हातावर थोडं मिश्रण घेऊन लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे पौष्टिक वेट लॉस लाडू खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.फिटनेस टिप्स