Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

How To Eat Your Meal In Right Proportions? Rujuta Diwekar Explains : आपला आहारच लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभाव उपाय ठरु शकतो, तो कसा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 07:28 AM2023-04-12T07:28:49+5:302023-04-12T07:50:35+5:30

How To Eat Your Meal In Right Proportions? Rujuta Diwekar Explains : आपला आहारच लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभाव उपाय ठरु शकतो, तो कसा...

Nutritionist Rujuta Diwekar Reveals The Right Proportions To Eat Meals In To Stay Healthy | वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

लठ्ठपणा ही आजच्या काळाची एक जागतिक समस्या बनली आहे. आपल्यापैकी बरेच लोक सध्या जास्त वजन किंवा लठ्ठपणा यांसारख्या समस्यांना तोंड देत आहेत. लठ्ठपणा आरोग्यासाठी हानिकारक असतोच. लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य समस्यांबद्दल लोक जागरुक होत आहेत. लठ्ठपणा वाढल्यामुळे आपण अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकतो, हे ओळखून लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकजण बरेच प्रयत्न करत असतात. कधी जिममध्ये एक्सरसाइज तर कधी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. परंतु काहीवेळा त्यानंतरही इच्छित परिणाम साध्य करण्यात अपयशी ठरतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने यावर एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ऋजुता दिवेकर म्हणते की, आपण योग्य प्रमाणात खात नसल्यामुळे असे होते. कधीकधी, आपण एकतर खूप कमी खातो किंवा आपल्या आहारातून आवश्यक पदार्थ काढून टाकतो. याचा आपल्या शरीरावर फारच गंभीर परिणाम होताना दिसतात. 

आपले चांगले शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याकडे आहाराला फार महत्व दिले जाते. रोजचा आहार किती व कोणत्या प्रमाणांत घ्यावा. यासोबतच रोजच्या आहारातील कोणता अन्नपदार्थ किती खावा यालासुद्धा खूप महत्त्व आहे. चुकीच्या प्रमाणात व चुकीच्या वेळेत आहार घेतल्यास त्याचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. यासाठी रोजच्या आहारातील कोणत्या अन्नपदार्थाची निश्चित मात्रा किती असावी याबद्दल सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने ५० - ३५ - १५ चा फॉर्म्युला सांगितला आहे(Nutritionist Rujuta Diwekar Reveals The Right Proportions To Eat Meals In To Stay Healthy).  

काय आहे ५० - ३५ - १५ चा फॉर्म्युला ?
 
सुप्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर हिने योग्य खाण्याचा फॉर्मुला सांगितला आहे. तिच्यानुसार ५० - ३५ - १५ चा फॉर्म्युला फॉलो करुन यानुसार जेवण केल्यास तुमचे आरोग्य सुदृढ राहते. ५० - ३५ - १५ च्या फॉर्म्युल्यामध्ये, ५० % भाकरी किंवा चपातीचा समावेश करू शकता. यानंतर ३५ % मध्ये डाळ किंवा भाज्यांचा समावेश करू शकता आणि १५ % मध्ये सॅलॅड, पापड, लोणच्याचा समावेश करावा. पण प्रत्येक गोष्ट किती प्रमाणात खावी हे अतिशय महत्वाचं आहे.

जेवणाच्या ताटाची साईज किती असावी ? 

प्रत्येक घरात लहान मुलांच ताट छोटं असतं. तर मोठ्या व्यक्तीचं ताट मोठं असतं. पण यापेक्षा तुम्ही आहारात पदार्थ किती प्रमाणात घेता हे महत्वाचं आहे. त्यामुळे मोठी व्यक्ती आहात म्हणून भरपूर न खाता ५०-३५-१५ चा फॉर्मुला फॉलो करावा. 

५० टक्क्यांत नेमकं काय येत ? 

तुमच्या राज्यात काय धान्य पिकते त्याचा समावेश यामध्ये येतो. जसे की, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी आणि अशी असंख्य वेगवेगळी धान्ये आहेत. गहू म्हणजे चपातीचा देखील यामध्ये समावेश येतो.

दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा...


३५ टक्क्यांत नेमकं काय येत ? 

सगळ्या प्रकारच्या डाळींचा यामध्ये समावेश होतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ६५ हजार डाळींच्या प्रकारांचा यात समावेश होतो. तसेच सगळ्या शिजवलेल्या भाज्या आणि मांसाहाराचा समावेश देखील यामध्ये येतो.

१५ टक्क्यांत नेमकं काय येत ? 

कच्चे सॅलॅड, दही, ताक, पापड, लोणचे यांचा समावेश उरलेल्या १५ टक्क्यांमध्ये होतो. त्यामुळे त्याचे प्रमाण देखील आहारात तेवढेच असणे गरजेचे आहे.

दर शनिवार-रविवारी तुम्ही हमखास करता ४ चुका, आठवडाभर राहता डल-उदास! पाहा काय कारण...

५० - ३५ - १५ चा फॉर्म्युला फॉलो केल्याने कोणते फायदे होतात ? 

१. तुमची पचनशक्ती सुधारते. 
२. शरीरासाठी उत्तम पोषणतत्वे मिळतात. 
३. उत्तम त्वचा आणि केस होतात. 
४. शौचाला जाऊन आल्यावर अतिशय हलके वाटते. 
५. जेवल्यावर गोड किंवा अनेकांना स्मोकिंग करण्याची सवय असते त्याची गरज भासत नाही.

Web Title: Nutritionist Rujuta Diwekar Reveals The Right Proportions To Eat Meals In To Stay Healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.