Weight Loss Drink: लठ्ठपणा जगभरात एक गंभीर समस्या बनला आहे. त्यात पोटावर वाढत असलेल्या चरबीनं लोक जास्त चिंतेत आहेत. जगभरात महिला लठ्ठपणामुळे जास्त हैराण झाल्या आहेत. बदलती लाइफस्टाईल, बदलतं खाणं-पिणं, कमी शारीरिक हालचाल यामुळे शरीरात चरबी जमा होते. जी नंतर कमी करणं फारच अवघड असतं. त्याहून चिंतेची बाब म्हणजे लठ्ठपणा वाढल्यावर शरीरात वेगवेगळ आजारही घर करतात. डायबिटीस, हृदयरोग, ब्लड प्रेशर असे आजार लठ्ठपणामुळे सगळ्यात जास्त होतात. अशात वजन नियंत्रित ठेवणं फार गरजेचं असतं. यासाठी लोक वेगवेगळे उपायही करतात. तुम्ही सुद्धा लठ्ठपणा आणि चरबी कमी करण्यासाठी वेगळा काही सोपा उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला ५ खास ड्रिंकबाबत सांगणार आहोत. ज्यांद्वारे तुम्ही स्लिम फिट व्हाल.
न्यूट्रिशनिस्ट अमाकानं इन्स्टाग्राम हॅंडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात चरबी कमी करणाऱ्या ५ खास ड्रिंकबाबत माहिती दिली आहे. जर नियमितपणे हे ड्रिंक प्याल तर तुम्हाला लठ्ठपणा लवकर कमी करण्यास मदत मिळेल. न्यूट्रिशनिस्टनुसार, रोज सकाळी उपाशीपोटी हे ड्रिंक प्यायल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत मिळते. ज्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते.
कोणते आहेत ड्रिंक आणि कसे बनवाल?
१) लिंबू आणि आल्याचं डिटॉक्स वॉटर
लिंबू आणि आल्याचं डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी १ लिंबू, १ चमचा किसलेलं आलं आणि २ कप कोमट पाणी घ्या. पाण्यात लिंबू पिळा आणि नंतर त्यात आलं टाका. हे चांगलं मिक्स करा. हे ड्रिंक सकाळी उपाशीपोटी प्यावं. लिंबू आणि आल्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. तसेच शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात. दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
२) काकडी-पदीना डिटॉक्स वॉटर
काकडी आणि पदीन्याचं गुणकारी डिटॉक्स वॉटर बनवणं फारच सोपं आहे. यासाठी १ काकडी, थोडा ताजा पदीना आणि चार कप पाणी हवं. काकडी कापून घ्या आणि पदीन्याची पानं धुवून घ्या. दोन्ही गोष्टी पाण्यात टाका आणि हे पाणी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावं.
काकडीमध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबर भरपूर असतं. फायबर वजन कमी करण्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. तेच पदीन्याच्या पानांमुळे पचन सुधारतं. पचनक्रिया चांगलं राहिली तर मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि शरीरात जमा झालेली चरबी कमी होऊ लागते.
३) अननस आणि आल्याची स्मूदी
अननस आणि आल्याची स्मूदी तुम्हाला १ कप अननसाचे तुकडे, १ चमचा किसलेलं आलं, अर्धा कप थंड पाणी किंवा नारळ पाणी आणि अर्ध्या लिंबाचा रस हवा. या सगळ्या गोष्टी ब्लेंडरमध्ये टाका आणि चांगल्या ब्लेंड करा. हे ड्रिंक उपाशीपोटी आणि हलकं काही जेवल्यानंतर पिऊ शकता.
अननसामध्ये कॅलरी खूप कमी असतात आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. फायबरनं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही आणि तुमचं ओव्हरईटिंग टाळलं जातं. त्याशिवाय अननसामध्ये ब्रॉमेलेन नावाचं एंझाइम असतं. जे फॅट बर्न करण्यासाठी मदत करतं. तर आल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं.
४) ग्रीन टी - लिंबाचं डिटॉक्स ड्रिंक
ग्रीन टी-नींबू डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी १ ग्रीन टी बॅग, १ कप गरम पाणी, अर्ध्या लिंबाचा रस आणि १ चमचा मध लागेल. ग्रीन टी पाण्यात ३ ते ५ मिनिटं बुडवून ठेवा. नंतर त्यात लिंबाचा रस, मध टाका.
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ग्रीन टी प्यायल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे शरीरात वाढलेली चरबी लवकर कमी करण्याची प्रोसेस वेगानं होते.