Weight Loss : वाढतं वजन ही जगभरातील लोकांसाठी एक गंभीर समस्या बनत चालली आहे. अशात वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग, एक्सरसाईज, योगा आणि वेगवेगळ्या औषधांची मदत घेतात. याचा सगळ्यांनाच फायदा मिळतो असं नाही. बऱ्याच लोकांचं वजन मेहनत घेऊनही कमी होत नाही. सोबतच अनेकांना वजन कमी करण्याची योग्य पद्धतही माहीत नसते. वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे पाणी आहे. पाण्यानं शरीर तर हायड्रेट राहतंच, सोबतच वजन कमी करण्यासही मदत मिळते. हार्वर्डच्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही जेवण करण्याआधी पाणी प्याल तर तुम्ही यानं वजन कमी करण्यास मदत मिळेल.
पाण्यानं पोट भरलेलं राहतं
जेवणाआधी पाणी प्यायल्यानं पोट भरतं, ज्यामुळे तुम्ही कमी खाता. अनेकदा लोक तहान लागण्याला भूक समजतात आणि जास्त खातात. पण जर तुम्ही जेवणाआधी पाणी प्याल तर तुम्हाला जास्त खाण्याची इच्छा होणार नाही. जेवणाआधी जर एक ग्लास पाणी प्याल तर तुम्ही कमी कॅलरी इनटेक कराल. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळेल.
मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण कायम ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा होते. जेव्हा मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, तेव्हा शरीर कॅलरी वेगानं बर्न करतं, ज्यामुळे आपोआप वजन वाढण्यास मदत मिळते. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, पाणी प्यायल्यानं शरीरातील कॅलरी बर्न होण्याचा दर ३० टक्क्यांपर्यंत वाढतो. खासकरून जेव्हा पाणी थंड असतं.
फॅट बर्निंग
वजन कमी करण्यासाठी शरीरातील फॅट बर्न करण्याची गरज असते आणि पाणी यासाठी भरपूर मदत करतं. जेव्हा शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळतं, तेव्हा फॅट बर्निंगची प्रक्रिया सोपी होते. पाणी प्यायल्यानं शरीराच्या कोशिकांमधील फॅट ऊर्जेच्या रूपात बर्न केलं जाऊ शकते. ज्यामुळे वजन कमी होतं.
पाणी पिण्याची वेळ
वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची वेळही महत्वाची ठरते. जेवण करण्याच्या अर्ध्या तास आधी पाणी प्यायल्यास भूक कंट्रोल होते आणि जास्त खाणं टाळता येतं. त्याशिवाय दिवसभर भरपूर पाणी प्यावं, जेणेकरून शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळेल.