Join us  

पोटाचे टायर्स दिसतात, कंबर सुटलंय? १ चमचा तिळाच्या तेलाची जादू; लवकर व्हाल स्लिम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 9:35 AM

Oil for weight loss and belly fat loss : हेल्दी आणि नैसर्गिक पदार्थ खाल्ल्यानं आणि रेग्युलर व्यायाम केल्यानं तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.

पोटाची चरबी वाढणं आरोग्याच्या अनेक गंभीर समस्याचं कारण ठरतं. (Weight loss diet) म्हणूनच लोक वजन आणि चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. (Oil for weight loss and belly fat loss) काहीजण या प्रयत्नात यशस्वी होतात तर काहीजण डाएट करण्याच्या प्रयत्नात फसतात. ज्याचा फारसा उपयोग होत नाही. वजन आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं असतं.(How to use sesame oil to reduce belly fat)

हेल्दी आणि नैसर्गिक पदार्थ खाल्ल्यानं आणि रेग्युलर व्यायाम केल्यानं तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.  नैसर्गिक पदार्थ कोणत्या न कोणत्या रुपात वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. आयुर्वेदीक एक्सपर्ट्स जीतूचंदन यांनी चरबी कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर कसा करायचा याबाबत सांगितले आहे.

व्हिटामीन ई

तेळाच्या तेलात व्हिटामीन इ मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे लीन मसल्स वाढण्यास मदत होते. फिजिकल फिटनेस वाढतो. लीन मलस्स मेटाबॉलिझ्म वाढवतात आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करतात. केस आणि त्वचा आणि नखांना हेल्दी ठेवण्यासाठी या तेलाची आवश्यकता असते. यात  सोल्यूबल फायबर्स, एंटीऑक्सिडंट्स, व्हिटामीन इ असते. याशिवाय मसल्स आणि रेड ब्लड सेल्सच्या वाढीसाठी हे गरजेचे असते. व्हिटामीन ई मुळे हृदयाचे आजार, एथेरोस्क्लेरोसिस आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका कमी होतो. 

प्रोटीन

तिळाच्या तेलात प्रोटीन्स जास्त  प्रमाणात असतात. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढण्यास आणि भूक कमी करण्यात मदत होते.  यामुळे तुम्ही कमी कॅलरीजचे सेवन करता आणि वजन कमी करण्यास  मदत होते. प्रोटीन्सच्या निर्मिती साठी हे आवश्यक आहे. तिळाच्या तेलात प्रोटीन्स व्यतिरिक्त कॅल्शियम, जिंक, कॉपर, ओमेगा-३ फॅटी एसिड्स आमि मॅग्नेशियम ही न्युट्रिएंट्स असतात.

फायबर्स

तिळाच्या तेलात डाएटरी फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. हे फायबर्स डायजेस्टिव्ग सिस्टीम दुरूस्त करण्यास मदत करतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ही फायबर्स इतर फूडसच्या तुलनेत पचण्यास  अधिक वेळ घेतात.  ज्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम कॅलरीज जास्त वापरते आणि तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही.

लिग्नान

तिळाच्या तेलात लिग्नान मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे फॅट्स बर्न होता. याव्यतिरिक्त बॅड कोलेस्टेरॉल कमी होऊन फॅट मेटाबॉलिझ्म कमी होते. तिळाच्या तेलात ट्रिप्टोफॅन आणि पॉलिफेनोल्स अशी दोन अमीनो एसिड्सस असतात. ज्यामुळे वजन कमी होऊन पोटाची चरबीही कमी होते. तिळाच्या तेलात सोडियम खूप कमी प्रमाणात असते. जे शरीरातील वॉटर रिटेंशन रोखते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य