आरोग्य कमावण्यासाठी, ते टिकवण्यासाठी, वजन आरोग्यदायी पध्दतीने कमी करण्यासाठी आपण सतत उपायांच्या शोधात असतो. उत्तम आरोग्य आणि योग्य वजनासाठी आहार हाच उत्तम उपाय आहे, हे एव्हाना सर्वच अभ्यासातून, संशोधनातून अभ्यासकांनी सांगून ठेवलं आहे. मात्र आहाराचे नवे पर्याय शोधताना जुने पर्याय हे विस्मरणात जाताना दिसतात. आहारतज्ज्ञ म्हणतात हे चुकीचं आहे. आपल्या आजी पणजी त्यांच्या आहारात ज्या घटकांचा समावेश करायचे त्याचा उपयोग आजही होतो हे सातूच्या पिठाच्या उदाहरणावरुन तज्ज्ञांनी दाखवून दिलं आहे. आज फार क्वचितच मोजक्या घरात सातूचं पीठ खाल्लं जातं. तज्ज्ञ म्हणतात की सातूला आपल्या आहारात जाणीवपूर्वक समाविष्ट केल्यास त्यातील गुणधर्मांचा शरीराला खूप फायदा होतो. आणि सातूचं पीठ आहारात असल्यानं वजन कमी होण्यास आणि नियंत्रित राहाण्यासही मदत होते.
Image: Google
सातुचं पीठ हे प्रामुख्यानं बिहार राज्यातील खाद्य प्रकार म्हणून ओळखला जातो. सातुचं पीठ म्हणजे गरीबांचं खाणं अशीही त्याची ओळख आहे. पण सातुच्या पिठातील गुणधर्मांची श्रीमंती बघून् फिटनेस राखण्यासाठी आता सातुच्या पिठाला खूप महत्त्व आहे. कलाकार, खेळाडू फिटनेस राखण्यासाठी आपणं कसं सातुचं पिठ सेवन करतो हे कौतुकानं सांगतात. सातुच्या पिठाला परदेशातही खूप मागणी आहे.
सातुचं पीठ म्हणजे पोषक घटकांचा खजिना आहे. वेगवेगळी धान्यं भाजून ते गार झाल्यावर दळून आणलं जातं. हे पीठ म्हणजेच सातूचं पीठ. वेगवेगळ्या धान्यांच्या एकत्रित समावेशामुळ सातूच्या पिठात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. केवळ फायबरच नाही तर आपलं आरोग्य सुधारण्यचे अनेक गुणधर्म सातूच्या पिठात आहे.
Image: Google
सातुच्या पिठात आहे तरी काय?
सातुच्या पिठात एकच एक गुणधर्म नसून सातूचं पीठ म्हणजे पोषक तत्त्वांचा खजिना आहे. यात फायबर, कर्बोदकं, प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. सातुच्या पिठातील या गुणधर्मांमुळेच सातुच्या पिठाला ‘सुपर फूड’ असं म्हटलं जातं. सातूचं पीठ सेवन केल्यानं व्यवस्थित जेवण केल्याची जाणीव होते. सातुच्या पिठामुळे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. सातुचं पीठ सेवन केल्यानं शरीरास ऊर्जा मिळते.
Image: Google
सातुच्या पिठाचे फायदे
1. सातुचं पीठ हे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच सातुचं पीठ हे हा मधुमेह असलेल्यांनी खाल्लं तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं. सातुच्या पिठात फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने सातू सकाळी नाश्त्याला असला तर पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. रक्तातील साखर, रक्तदाब नियंत्रित करण्यस सातुच्या पिठाच्या सेवनचा उपयोग होतो. शिवाय शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण नियंत्रित राहातं. यामुळे हदयविकाराचा धोका टळतो.
2. सातुचं पीठ वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं. सातुच्या पिठात प्रथिनं आणि फायबर यांचं प्रमाण चांगलं असतं. सुपर फूड म्हणून ओळखला जाणारं सातुचं पीठ आपल्या पचनक्रियेला मजबूत करण्याचं काम करतं. सातुच्या पिठाचं सेवन केल्यास दिवसभर ताजतवानं वाटतं. या गुणधर्मांमुळे पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. इतर काही खाण्याची इच्छा निर्माण होत नाही. म्हणूनच सातूच पीठ वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतं.
3. मुलांच्य वाढीसाठी सातूचं पीठ हा रामबाण उपाय आहे. प्रथिनं, अ जीवनसत्त्व, कर्बोदकं, खनिजं , फायबर मोठ्या प्रमाणात असतं. हे सर्व घटक मुलांचं मानसिक ओरोग्य यासाठी फायदेशीर आहे.4. पोटाच्या संदर्भात कोणतीही समस्या निर्माण झाली तर सातूचं पीठ खायला हवं. सातूचं पीठ रिकाम्या पोटी घेतल्यास पचन क्रिया सुधारते. सातुच्या पिठात मीठ, लोह आणि फायबर हे गुण असतात. सातुच्या पिठाचे गुणधर्म पोटाच्या समस्या बर्या करण्यास मदत करतात आणि पोट स्वच्छ करण्यासही सातुच्या पिठाचा उपयोग होतो.
Image: Google
सातुचं पीठ कसं खावं?
सातुचं पीठ विविध प्रकारे खाता येतें. सातुचं पीठ गुळाच्या पाण्यात भिजवून त्याचं गोड सरबत किंवा थोडं मीठ आणि जिरे घालून करता येतं. सातुच्या पीठाचे आरोग्यवर्धक लाडू, एनर्जी बार करता येतात सोबतच सातुचे पराठे, धिरडे करता येतात . ते चविष्ट आणि आरोग्यदायी असतात.
सातू खाण्याचे नियम
सातुचं पीठ हे सूपरफूड म्हणून ओळखलं जात असलं, ते पोषक घटकांचा खजिना असलं तरी सातुचं पीठ खाण्याचेही नियम आहेत. हे नियम काय सांगतात?1. जेवल्यानंतर कधीही सातुचं पीठ खाऊ नये.2. सातू पौष्टिक असलं तरी ते कमी प्रमाणात सेवन करायला हवं.3. सातुचं पीठ खाताना मधेमधे पाणी पिऊ नये.4. रात्री सातूचं पीठ खाऊ नये.