Join us  

दिवसातून एकदाच जेवण्याने वजन १०० टक्के घटते, पण तब्येतीवर काय भयंकर दुष्परिणाम होतात पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2024 1:46 PM

One meal a day: Health benefits and risks..Does it helps for Weight Loss : वन मिल अ डे आरोग्यासाठी चांगले की वाईट? यामुळे खरंच शरीर कमकुवत होते?

सहसा आपण दिवसातून ३ वेळा जेवतो (Weight Loss). सकाळचा नाश्ता, दुपारचं लंच आणि रात्रीचं डिनर हे हमखास असतेच. पण ज्यांना वजन कमी करायचं असतं ते, लोक यापैकी २ वेळचं अन्न स्किप करतात (One meal a Day). किंवा काही कारणास्तव एक वेळचं जेवण स्किप होतं (Health Benefits). तर काही लोकांना नाश्ता स्किप करण्याची सवय असते. परंतु, असे देखील काही लोक आहेत, जे वजन कमी करण्यासाठी नाश्ता किंवा रात्रीचं डिनर स्किप करतात (Fitness).

दिवसातून एकदाच अन्न खातात. पण आता दिवसातून एकदाच अन्न खाणं योग्य आहे का? यामुळे खरंच वजन कमी होऊ शकतं का? की आणखीन कोणत्या आजाराला शरीर बळी पडेल?(One meal a day: Health benefits and risks..Does it helps for Weight Loss).

यासंदर्भात, लल्लन टॉप या वेबसाईटला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट दीप्ती खातुजा यांनी माहिती दिली आहे. वन मिल अ डेमध्ये दिवसातून एकदाच खाल्ले जाते. जर भूक लागल्यास साधे पाणी, ब्लॅक टी, साखर नसलेली ब्लॅक कॉफी किंवा साखरेशिवाय लिंबू पाणी पिता येते. यामुळे वजन कमी होऊ शकते, पण याचे काही दुष्परिणाम आहेत. शिवाय पुन्हा तीन वेळचं अन्न खाण्यास सुरुवात केल्यानंतर पुन्हा वजन वाढू शकते.'

जरा चाललं की लगेच दम लागतो? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; वाढेल स्टॅमिना - हाडंही राहतील मजबूत

दिवसातून एकदाच अन्न खाल्ल्याने काय होईल?

जर आपण दिवसातून एकदाच अन्न खात असाल तर, आपले वजन कमी होऊ शकते. याच्या मदतीने आपले शरीर डिटॉक्स होऊ शकते. पण दिवसातून एकदाच अन्न खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.

दिवसातून एकदाच अन्न खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. जर आपण कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल तर, आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. सुरुवातीला आपल्याला जेवण स्किप करणं सामान्य वाटेल, पण हळूहळू ही समस्या अधिक वाढत जाईल.

जेवण वगळण्याचे तोटे

दिवसातून एकदा अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांची कमतरता भासू शकते. शिवाय आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. कारण जेव्हा आपण एक वेळ अन्न खातो, तेव्हा शरीराला आवश्यक फायबर मिळत नाही. हाडं कमकुवत होऊ शकतात. शिवाय याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. कारण भूक लागल्यावर व्यक्ती रागावते आणि चिडचिड करते.

कांदा भजी कुरकुरीत होत नाहीत? मऊ पडतात? त्यात घाला '१' मसाला'; भजी होतील परफेक्ट क्रिस्पी

महिलांनी टाळावी ही गोष्ट

महिलांनी फक्त एक वेळच अन्न खाऊ नये. कारण महिलांच्या आयुष्यात अनेक बदल घडत असतात. मासिक पाळी, रजोनिवृत्ती, स्तनपान , गर्भधारणा याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे तीन वेळ अन्न खा, व्यायाम करा, शरीराची हालचाल गरजेची. यासह हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स