हिवाळ्यात भरपूर खाणं पिणं होतं (Winter Cravings). ज्यामुळे वजन वाढण्याची भीती निर्माण होते. कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते. आणि पोट देखील सुटत जाते (Food). वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट महत्वाचे आहे. पण हिवाळ्यात व्यायाम करण्याची इच्छा होत नाही (Weight Loss). ज्यामुळे आपलं अधिक वजन वाढत जातं. वजन वाढलं की, मधुमेह, हृदयरोग, फॅटी लिव्हर आणि अगदी कॅन्सरचाही त्रास सुरु होतो.
जर खाऊनही वजन वाढत असेल तर, आहारात काही पदार्थांचा समावेश करून पाहा. यामुळे वेट लॉस तर नक्कीच होईल. यासह गंभीर आजारांचाही धोका कमी होतो(Overeating in winter? 3 Foods for Weight Loss).
हिवाळ्यात फक्कड चहा प्यायचाय? चहा करताना ‘हा’ पदार्थ घाला, सर्दी - खोकलाही राहील दूर
बाजरी आणि मेथीचे दाणे
आहारतज्ज्ञांच्या मते, 'गव्हाची पोळी खाऊनही वारंवार भूक लागत असेल तर, बाजरीची भाकरी खा. जे वेट लॉस करण्यास मदत करते. बाजरीमध्ये २०१ कॅलरीज, ग्राम प्रोटीन, १.७ ग्राम फॅट्स, ४० ग्राम कार्ब्स असतात. आपण बाजरीची भाकरी, खिचडी खाऊ शकता. त्यात मेथीचे दाणे घाला. यामुळे पौष्टीक घटक वाढतील.
कणीक भिजवताना मीठ घालावे की नाही? कुणी म्हणतं पोट बिघडेल कुणी म्हणतं नाही-खरं काय?
दालचिनी आणि ऍपल सायडर व्हिनेगर
दालचिनी आणि ऍपल सायडर व्हिनेगरही वेट लॉससाठी मदत करतात. दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे वेट लॉससाठी मदत करतात. यासह ब्लड शुगर कमी करण्यासही मदत करतात. आपण पदार्थात दालचिनी आणि ऍपल सायडर व्हिनेगर घालू शकता.
हिरव्या पालेभाज्या आणि कलौंजी
हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे जळजळ कमी करून वजन कमी करण्यास मदत करतात. वेट लॉससाठी विशेषतः पालक खावे. यामुळे वेट लॉस होते. यासह कलौंजीमध्ये चयापचय बुस्ट करणारे संयुगे असतात. ज्याचा फायदा पचनक्रिया सुरळीत, केस आणि त्वचेलाही होतो.