सतत वाढणारे वजन आणि पोटाची ढेरी ही सध्या बऱ्याचजणांची एक कॉमन समस्या झाली आहे. वाढलेलं वजन आणि पोटाची ढेरी काही केल्या कमी होतच नाही. वजन आणि पोटाची ढेरी कमी (When You Eat Papaya To Lose Weight) करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. कुणी डाएट करत तर कुणी जिम, योगा, एक्सरसाइज असे वेगवेगळे उपाय करुन पाहिले जातात. वजन कमी करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणांत फळं (Papaya for weight loss) आणि भाज्यां खाण्याचा सल्ला दिला जातो. वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी लो कॅलरीज फळांचा समावेश आहारात करणे फायद्याचे असते. सर्व फळांमध्ये वजन कमी करण्यासाठी पपई म्हणजे सुपरफूड मानले जाते(Papaya Health Benefits for Weight Loss).
'पपई' हे एक असं फळं आहे जे लो कॅलरीजचे असते, तसेच एकदा खाल्ल्याने दीर्घकाळ आपले पोट भरलेले राहते. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही, यामुळे वजन कमी करण्यासाठी हे सुपरफूड खाणे अधिक फायदेशीर ठरते. परंतु वजन कमी करण्यासाठी पपई योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे अधिक फायदेशीर ठरते. वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी पपईचा रोजच्या आहारात समावेश कसा करावा आणि खाण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूयात.
वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी पपई खाणे कसे फायदेशीर ठरते ?
पपई हे अत्यंत कमी कॅलरीज असलेले फळ आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणांत फायबर असते. यातील लो कॅलरीज आणि फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी पपई सुपरफूड मानली जाते. पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे पचन सुधारते आणि शरीरात साठलेली चरबी कमी करण्यास मदत करते.
शिल्पा शिरोडकरने 'हा' खास फॉर्म्युला वापरुन वयाच्या पन्नाशीत केलं वजन कमी, पाहा सिक्रेट...
वजन कमी करण्यासाठी भाज्या खाताय पण कोणत्या? ‘या’ ६ भाज्या वाढवतात तुमचं वजन भरभर...
पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, पपई खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते यामुळे वारंवार भूक लागत नाही. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन 'ए' आणि अनेक खनिजे आढळतात जे चयापचय वाढवतात. जलद चयापचयामुळे, कॅलरीज देखील जलद बर्न होतात यामुळे पपई खाल्ल्याने वजन जलद गतीने कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी पपई खाण्याची योग्य पद्धत...
वजन आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. सकाळी पपई खाल्ल्याने पचनसंस्था सक्रिय होते, ज्यामुळे पोटावर जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी १ वाटी ताजी चिरलेली पपई खा. तुम्ही पपईमध्ये लिंबाचा रस देखील मिसळून खाऊ शकता, यामुळे पपईचे पौष्टिक गुणधर्म आणखी वाढतात.
पोटाची ढेरी काही केल्या कमीच होत नाही? टेंशन सोडा, खा ‘हे’ ५ पदार्थ, पोट कमी झालंच समजा...
आपण पपई सॅलड म्हणूनही खाऊ शकता. जर तुम्हाला हलके जेवण करायचे असेल तर संध्याकाळी पपई खा. यामुळे तुमचे जेवण पूर्ण होईल आणि तुमचे पोटही भरलेले राहील. पपईत अँटीओबसिटी गुणधर्म असतात. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार यातील प्रभावामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पिकलेली पपई सालं काढून बिया काढून तुम्ही याचे सेवन करू शकता. कच्ची पपई तुम्ही सॅलेड्सच्या स्वरूपात खाऊ शकता. साखर न घालता स्मूद बनवू शकता किंवा फ्रूट सॅलेडच्या स्वरूपात पपईचे सेवन करू शकता.