Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उन्हाळ्यात पपई खा आणि पोटभर प्या! पपई स्मूदी वजन करते कमी, चवीला भारी

उन्हाळ्यात पपई खा आणि पोटभर प्या! पपई स्मूदी वजन करते कमी, चवीला भारी

उन्हाळ्यात लागणारी भूक, तहान आणि पोषण यांचा विचार करता पपईची स्मूदी पिणं फायदेशीर मानलं जातं. रोज सकाळी बाहेर पडण्यापूर्वी एक ग्लास पपईची स्मूदी प्यायल्यास शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 04:18 PM2022-03-18T16:18:03+5:302022-03-18T16:46:38+5:30

उन्हाळ्यात लागणारी भूक, तहान आणि पोषण यांचा विचार करता पपईची स्मूदी पिणं फायदेशीर मानलं जातं. रोज सकाळी बाहेर पडण्यापूर्वी एक ग्लास पपईची स्मूदी प्यायल्यास शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहाते.

Papaya smoothie is healthy and best detox drink in summer.. how? | उन्हाळ्यात पपई खा आणि पोटभर प्या! पपई स्मूदी वजन करते कमी, चवीला भारी

उन्हाळ्यात पपई खा आणि पोटभर प्या! पपई स्मूदी वजन करते कमी, चवीला भारी

Highlightsउन्हाळ्यात पपईची स्मूदी नियमित प्यायल्यानं त्वचा चमकदार होते.पपईची स्मूदी उत्तम डिटाॅक्स ड्रिंक आहे. पपईची स्मुदी प्यायल्याने पाळीशी निगडित समस्या कमी होतात.

उन्हाळ्यात खाण्यपेक्षा काहीतरी सतत पित राहाण्याची इच्छा होते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होवू नये द्रवपदार्थांचं सेवन फायदेशीर ठरतं. पण नुसते ज्यूस आणि सरबतं पिल्याने तहान भागते, त्या मानानं शरीरास पोषण कमी मिळतं. आहारतज्ज्ञ सुगीता मुटरेजा ज्यूसपेक्षाही स्मूदी पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात लागणारी भूक, तहान आणि पोषण यांचा विचार करता पपईची स्मूदी पिणं फायदेशीर मानलं जातं. रोज सकाळी बाहेर पडण्यापूर्वी एक ग्लास पपईची स्मूदी प्यायल्यास शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहाते. पपईची स्मूदी पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढून आरोग्य जपण्यास त्याची मदत होते. 

Image: Google

पपईची स्मूदी पिण्याचे फायदे

1. पपईच्या स्मूदीतून कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, प्रथिनं, पोटॅशियम, ऊर्जा, अ, ब आणि क जीवनसत्वं मिळतात. उन्हाळ्यात पपईची स्मूदी नियमित प्यायल्यानं त्वचा चमकदार होते. पपईत फायबरचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळे या फायबरचा उपयोग शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी होतो. पपईच्या स्मूदीत क जीवनसत्वं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. या घटकांचा त्वचेस फायदा होतो. पपईमधील पैपेन नावाच्या विकरमुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जातात. चेहऱ्यावरील डाग, मुरुम, पुटकुळ्या आणि सुरकुत्या या त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी पपईची स्मूदी पिणं फायदेशीर ठरतं. 

2. पपईच्या स्मूदीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. ही स्मूदी पिल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहातं. सारखी भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी पपईची स्मूदी पिणं फायदेशीर ठरतं. पपईची स्मूदी नियमित प्यायल्यास वजन निय्ंत्रित राहातं. पपईच्या स्मुदीमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असल्यानं वजन कमी करण्यासाठी पपईच्या स्मुदीची मदत होते.  पपईच्या स्मुदीतील फायबरमुळे पचन व्यवस्था नीट काम करते. पचनासंबंधी विकारांचा धोका टळतो. पपईची स्मुदी प्यायल्याने अपचन, बध्दकोष्ठता या पचनाशी निगडित समस्या बऱ्या होतात. 

Image: Google

3. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले ॲण्टिऑक्सिडण्टस, पोटॅशियम या घटकांचं प्रमाण पपईच्या स्मुदीमध्ये जास्त असतं. पपईच्या स्मुदीमधील फायबर आणि जीवनसत्वं पपईमधील फॅटसचं रुपांतर ऊर्जेत करतात. यामुळे रक्तवाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या धरत नाहीत. रक्तप्रवाह सुरळीत राहातो. म्हणूनच पपईची स्मुदी प्यायल्यानं हदयाच्या आरोग्यास फायदा होतो. 

4. पपईच्या स्मुदीत क जीवनसत्वाचं प्रमाण भरपूर असल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढून श्वसन यंत्रणा सुदृढ राहाते. पपईची स्मुदी पिल्यानं श्वसनयंत्रणेस आलेली सूज कमी होते. तोंडातील जखमा भरुन निघतात. पपईच्या स्मुदीनं रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

5. महिलांच्या आरोग्यासाठी पपईची स्मूदी फायदेशीर मानली जाते. पपईची स्मुदी प्यायल्याने पाळीशी निगडित समस्या कमी होतात. अनियमित पाळीची समस्या दूर होते. तसेच पाळीमध्ये होणाऱ्या वेदना, पेटके यापासून मुक्ती मिळते. 

Image: Google

पपईची स्मूदी कशी कराल?

पपईची स्मुदी करण्यास अत्यंत सोपी आहे. स्मुदी करण्यासाठी  2 कप पिकलेली पपई, चवीपुरतं मध, आवडत असल्यास पाव चमचा हळद,  अर्धा कप संत्र्याचा रस घ्यावा. आधी पिकलेली पपई कापून घ्यावी. ती मिक्सरमधून किंवा ब्लेण्डरनं बारीक करुन घ्यावी. बारीक केलेल्या पपईत पाव चमचा हळद, अर्धा कप संत्र्याचा रस घालून मिश्रण पुन्हा मिक्सरमधून पुन्हा फिरवून घ्यावं. स्मूदी एका ग्लासमध्ये काढावी. हा ग्लास थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून स्मूदी थंडं करुन घ्यावी. 

Web Title: Papaya smoothie is healthy and best detox drink in summer.. how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.