सुका मेवा म्हणदेच ड्रायफ्रुट्स अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. काजू, शेंगदाणे, पिस्ता, बदाम आणि आक्रोड असे काही पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश करायलाच हवा. यातून शरीराला व्हिटामीन्स, खनिज , प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात मिळतात. (Peanuts vs almonds) सुक्या मेव्याचे पदार्थ महाग असतात ज्यामुळे सगळेचजण हे पदार्थ खाऊ शकत नाहीत. असं म्हटलं जातं की शेंगदाण्यांमध्ये बदामापेक्षा जास्त पोषक तत्व असतात. आरोग्यासाठी शेंगदाणे अधिकाधिक फायदेशीर ठरतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात समजून घेऊ. (Peanuts vs Almonds Which nut is more nutritious?)
शेंगदाण्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. शेंगदाणे प्रोटीन्सने परिपूर्ण असतात. यात प्लांटबेस्ड प्रोटीन अधिकाधिक असते. जे शाकाहारी आणि व्हिगन लोकांसाठी प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. यात अमिनो एसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. मोनो सॅच्युरेडडेट फॅटी एसिड्सचाही हा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे हृदयाच्या समस्या टळण्यास मदत होते. (Almonds Vs Peanuts Which One Is More Healthy)
तर बदामात एकापेक्षा जास्त पोषक तत्व असतात. शरीराला व्हिटामीन ई मिळते. हा एंटी ऑक्सिडंट्सचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून बचाव होतो. त्वचेचे आरोग्यही चांगले राहते. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
यात हेल्दी फॅट्सही असतात ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यात कॅल्शियमही असते. जे हाडं आणि दातांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त बदामात फ्लेवेनॉईड्स आणि पॉलीफेनोल्स असतात. ज्यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात.
रात्रीच्या उरलेल्या खिचडीचा करा कुरकुरीत डोसा; झटपट बनेल नाश्ता-पाहा एकदम सोपी रेसिपी
बदाम खावेत की शेंगदाणे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यात अनेक पोषक तत्व असतात. बदामात व्हिटामीन ई-कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. प्रोटीन्स वाढण्यासाठी हे उत्तम ठरतात. यातील वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे ते अधिक प्रमाणात खाल्ले जातात.
१) रोज शेंगदाणे खाल्ल्याने मांसपेशी वाढण्यात आणि त्यांच्या विकासास मदत होते. भिजवलेले शेंगदाणे खाणं तब्येतीसाठी उत्तम मानलं जातं. १०० ग्राम शेंगदाण्यात जवळपास २५ ग्राम प्रोटीन्स असतात. यात शरीरासाठी आवश्यक मॅक्रोन्युट्रिएंट्स असतात.
नवरात्रीत ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी; तब्येतीला त्रास न होता करता येतील उपवास आनंदाने
२) शेंगदाण्यांमध्ये हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासही मदत होते. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. हृदयाला भरपूर प्रमाणात पोषण मिळते.