Join us  

३१ डिसेंबरच्या आत वजन कमी करायचंय? हा घ्या महिनाभराचा प्लॅन- ३० दिवसात होईल जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 12:29 PM

Perfect Diet Plan For Fast Weight Loss: महिनाभरात वजन कसं कमी करावं, हा प्रश्न पडला असेल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेला हा डाएट प्लॅन एकदा फॉलो करून पाहा..(how to lose weight easily in one month?)

ठळक मुद्देयोग्य आहार आणि व्यायाम करून अवघ्या महिन्याभरातच वजन कसं कमी करायचं ते पाहूया...

वाढलेलं वजन कमी कसं करावं हा प्रश्न सध्या बऱ्याच जणांना छळतो. कारण प्रत्येकाचीच जीवनशैली बदललेली आहे. अधिकाधिक वेळ आपल्याला एकाच जागेवर बसून काम करावं लागतं. शिवाय प्रत्येकालाच व्यायामासाठी वेळ मिळतो असे नाही. शारिरीक हालचाली कमी झालेल्या असतानाच आहारात प्रोसेस्ड फूड, जंक फूड, साखर, मीठ या पदार्थांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे (perfect diet plan for fast weight loss). यामुळेच वजन झपाट्याने वाढतं आणि त्या तुलनेत मात्र आपण ते कमी करायला गेलो तर बराच वेळ लागतो (how to lose weight easily in one month?). म्हणूनच आता योग्य आहार आणि व्यायाम करून अवघ्या महिन्याभरातच वजन कसं कमी करायचं ते पाहूया...(best weight loss diet plan by health expert)

 

महिनाभराचा खास डाएट प्लॅन

योग्य डाएट प्लॅन तुम्ही घेतला आणि त्या जोडीला पुरेसा व्यायाम केला तर अगदी दीड ते दोन महिन्यातच तुमचं भरपूर वजन कमी होऊ शकतं असं आहारतज्ञ प्राची चंद्रा सांगतात. यासाठी त्यांनी आठवड्याचा डाएट प्लॅन कसा असावा, याविषयीची माहिती साेशल मिडियावर शेअर केली आहे. दररोज कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा ते बघा 

फुगलेलं शरीर, सुटलेलं पोट झटपट कमी करणारं 'पिवळं' पाणी! रोज नियमितपणे प्या- पोट होईल सपाट 

सोमवारी नाश्त्याला दोन ब्राऊन ब्रेड खा. दुपारच्या जेवणात एक पोळी, वाटाण्याची आमटी, सलाड आणि एक वाटी दही. संध्याकाळी स्वीट कॉर्न चाट आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणात उकडलेल्या भाज्या खाव्या.

मंगळवारी नाश्त्यामध्ये नाचणीचा डोसा आणि अर्धा बाऊल सांबार, दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस आणि स्टीम केलेल्या भाज्या, वाटीभर दही घ्यावं. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये दोन खजूर आणि पाच बदाम. तसेच रात्री परतून घेतलेल्या भाज्या.

 

बुधवारी नाश्त्यामध्ये धिरडं आणि भाज्या, दुपारी एक पोळी, हरभऱ्याची आमटी, सलाड आणि ताक. संध्याकाळी रोस्टेड मखाना आणि रात्री एक वाटी मुगाच्या डाळीची खिचडी आणि एक वाटी सलाड.

बाल्कनीत कुंड्या ठेवायला जागा नाही? घरात बाटलीमध्ये पाण्यात लावा 'ही' रोपं, मातीची गरजच नाही

गुरुवारी नाश्त्यात एक वाटी ओट्स आणि फळं, दुपारच्या जेवणात भात- भाज्या आणि सलाड, संध्याकाळी ग्रील्ड पनीर आणि रात्रीच्या जेवणात धिरडं किंवा थालपीठ आणि उकडलेल्या भाज्या. शुक्रवारी नाश्त्यामध्ये दोन इडल्या आणि अर्धी वाटी सांबार, दुपारच्या जेवणात एक चपाती, भाजी आणि सलाड. संध्याकाळी पीनट चाट आणि रात्रीच्या जेवणात सूप आणि वाफवून घेतलेली ब्रोकोली.

 

शनिवारी नाश्त्यासाठी दोन धिरडे आणि हिरवी चटणी, दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस आणि पालक सलाड, संध्याकाळी फुटाणे, रात्रीच्या जेवणात एक पोळी आणि कुठलीही सिझनल भाजी.

दिवाळीत उरलेल्या सोनपापडीची करा चवदार खीर, किलोभर सोनपापडी चटकन संपेल- घ्या रेसिपी 

रविवारी नाश्त्यामध्ये सँडविच, दुपारच्या जेवणात बिर्याणी आणि सलाड, संध्याकाळी एक कप चहा किंवा कॉफी, रात्री ग्रील्ड पनीर किंवा टोफू आणि मिक्स भाज्या. 

याशिवाय दररोज सकाळी ७ ते ८ या दरम्यान लिंबू पाणी किंवा जीरा पाणी किंवा गरम पाणी आणि त्यात थोडं ॲपल साइड विनेगर किंवा आवळ्याचा ज्यूस किंवा एखाद्या भाजीचा ज्यूस असं काही ना काही घ्या.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सअन्न