Join us  

थंडीत दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायची तर सकाळी उठल्या उठल्या खा 4 पदार्थ ; चहाला उत्तम पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 9:54 AM

Perfect Options to have In Winter Morning : थंडीच्या दिवसांत तर सकाळी पोट रिकामे झाल्यावर आपल्याला अचानक खूप भूक लागते अशावेळी आपण काय खायला हवे याविषयी..

ठळक मुद्दे उठल्यावर १ गुळाचा खडा आणि मूठभर दाणे खायला हरकत नाही. थंडीत सकाळी उठल्यावर एनर्जी आणि ताकद मिळावी यासाठी चहा-कॉफीला उत्तम पर्याय..

थंडीच्या दिवसांत शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. या काळात बाहेरील तापमान कमी असल्याने शरीर जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च करते. अशावेळी शरीराला पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी आणि शरीराचे चांगले पोषण होण्यासाठी आपण आहारात आवर्जून काही पदार्थांचा समावेश करतो. आता दिवसभराचे डाएट काय असावे याविषयी आपण नेहमीच बोलतो. पण सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काय खायला हवे याविषयी मात्र आपण फारसा विचार करत नाही. आपल्याकडे आजही सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी घेण्याची पद्धत आहे. मात्र असे करणे आरोग्यासाठी उपयुक्त नसते. तर सकाळी उठल्यावर शरीराला एनर्जी मिळेल अशा गोष्टींचा आहारात समावेश असायला हवा. थंडीच्या दिवसांत तर सकाळी पोट रिकामे झाल्यावर आपल्याला अचानक खूप भूक लागते अशावेळी आपण काय खायला हवे याविषयी (Perfect Options to have In Winter Morning)...

(Image : Google)

१. खजूर 

खजूर हा लोहाचा उत्तम स्त्रोत असतो. त्यामुळे ज्यांना हिमोग्लोबिनची किंवा आयर्नची कमतरता आहे अशांसाठी खजूर हे सुपरफूड आहे. सकाळी उठल्यावर ३ ते ४ बिया खजूर खाल्ल्यास आपल्यााल भरपूर एनर्जी मिळते. त्यामुळे खजूर हा सकाळी उठल्यावर खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. 

२. काळे मनुके आणि सुकामेवा 

काळे मनुके अॅसिडीटी किंवा अपचनासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारखे त्रास होत असतील तर काळे मनुके फायदेशीर ठरतात. रात्री झोपताना बदाम, काळे मनुके, पिस्ते, आक्रोड या गोष्टी पाण्यात भिजत घातल्या तर सकाळी उठल्यावर हा सुकामेवा खाणे फायदेशीर ठरते. 

३. फळं 

ताजी फळं हा तर सकाळी उठल्या उठल्या खाण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. थंडीच्या दिवसांत सफरचंद, पपई, सोनकेळी, चिकू अशी गर असलेली गोड फळं खाल्ल्याने शरीराला एनर्जी तर मिळतेच पण त्यामुळे जीवनसत्त्व आणि खनिजे मिळण्यासही मदत होते.  

(Image : Google)

४. गूळ - दाणे 

उन्हाळ्याच्या दिवसांत हा एक उत्तम आहार मानला जातो. शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यासाठी आणि ताकद येण्यासाठी गूळ आणि दाणे अतिशय फायदेशीर असतात. दाणे हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असून गुळातूनही शरीराला लोह, खनिजे मिळतात. त्यामुळे उठल्यावर १ गुळाचा खडा आणि मूठभर दाणे खायला हरकत नाही. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाथंडीत त्वचेची काळजी