Join us  

नाश्ता करा पोटभर, मात्र नाश्त्याला हवा वेटलॉस ब्रेकफास्ट! ३ परफेक्ट फूड कॉम्बिनेशन, वजन उतरेल झरझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2022 8:00 AM

How To Do Weight Loss Breakfast: नाश्ता नेहमी हेवी करावा, पोटभर करावा, हे आपण जाणतोच. पण असा हेवी नाश्ता करून वजन तर वाढत (weight gain) नाही ना, याचीही काळजी घ्यायलाच हवी...

ठळक मुद्देसकाळी जर तुमच्या नाश्त्यात असं फूड कॉम्बिनेशन ठेवलं, तर वजन कंट्रोल ठेवण्यात नक्कीच मदत होईल.

नाश्ता हा नेहमी राजासारखा करावा. म्हणजेच नाश्ता हेवी असावा, पोटभर असावा, हे आपण नेहमीच ऐकतो. दिवसाच्या सुरुवातीला आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम रेट (metabolism rate) उत्तम असतो. त्यामुळे चयापचय क्रियेचा वेग योग्य असतो. त्यामुळे नाश्ता पोटभर असावा, असं म्हणतात. पण असा नाश्ता करून वजन वाढणार (Perfect weight loss breakfast) तर नाही ना, याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुमच्या नाश्त्यामध्ये कार्ब्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि फॅट्स योग्य प्रमाणात असतील, तर वजन वाढणार नाही. यासाठीच ही खास माहिती. सकाळी जर तुमच्या नाश्त्यात असं फूड कॉम्बिनेशन (Best food combination in breakfast) ठेवलं, तर वजन कंट्रोल ठेवण्यात नक्कीच मदत होईल. (perfect healthy breakfast)

 

असं करा नाश्ता..१. ओटमील आणि नटबटरओटमील हे वेटलॉससाठी एक उत्तम अन्न मानलं जातं. American College of Nutrition यांच्या अभ्यासानुसार ओटमीलचा नाश्ता करणाऱ्यांना चटकन पोट भरल्यासारखं वाटतं. लवकर भूक लागत नाही. तसेच त्यांची एनर्जी अधिककाळ टिकून राहते. कारण त्यात भरपूर फायबर असतात. भात आवडतो? बिंधास्त खा, पण त्यासोबत भाज्या आणि सलाड किती खायचं? हे घ्या प्रमाण त्यामुळे मग आपोआपच दुपारच्या जेवणात त्यांच्याकडून कमी कॅलरी खाल्ल्या जातात. ओटमीलमध्ये जर दोन टेबलस्पून नट बटर टाकून खाल्लं तर त्यामुळे तुम्हाला ८ ग्रॅम प्रोटीन्स आणि काही हेल्दी फॅट्स मिळतात. त्यामुळे ओटमील आणि नट बटर हे एक उत्तम कॉम्बिनेशन होऊ शकतं.

 

२. योगर्ट आणि बेरीयोगर्टमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण खूप जास्त असते. पण त्यासाठी फ्लेवर्ड योगर्ट खाणे टाळावे. याशिवाय योगर्टच्या माध्यमातून शरीरात कमी प्रमाणात कॅलरी आणि फॅट्स जातात, असं International Journal of Obesity या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. योगर्टसोबत तर बेरी प्रकारातली फळं घेतली तर त्यातून नक्कीच प्रोटीन्स मिळतात. शिवाय बेरीमधून भरपूर प्रमाणात flavonoids नावाचे ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. फक्त ३ सवयी बदलल्या तर वजन वाढणारच नाही, आणि वाढलेलं वजनही होईल लवकर कमी flavonoids वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्यामुळे हे फूड कॉम्बिनेशन वजन वाढू न देण्यासाठी निश्चितच मदत करणारं आहे.

 

३. सब्जा आणि हिरव्या पालेभाज्याJournal of Nutrition यांच्या अहवालानुसार आहारात भरपूर प्रमाणात फायबर घेतल्याने निश्चतच वजन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. यासाठीचा एक उपाय म्हणजे सब्जा आणि हिरव्या पालेभाज्या यांचं कॉम्बिनेशन नाश्त्यामध्ये घेणं. यासाठी एक टेबलस्पून सब्जा तुमच्या आहारात असावा. डोळ्यांचा थकवा, सुटलेलं पोट आणि केसांचं आरोग्य- समस्या 3 उत्तर 1 - आहारात हवीच एक गोष्ट त्यातून ५ ग्रॅम फायबर मिळतात. यासोबतच हिरव्या पालेभाज्यांचं सूप किंवा स्मुदी घ्या. त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि आवश्यक खनिजे मिळतात. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सअन्न