एकीकडे स्वत:च्या वाढत्या वजनाचा आकडा दिसत असतो, दुसरीकडे पिझ्झा खाणं (eating pizza is healthy or unhealthy?) आरोग्यासाठी किती वाईट याविषयी आपण जे काय काय वाचलेलं असतं किंवा ऐकलेलं असतं ते दिसत असतं. पण तरीही या दोन्हींपेक्षा जास्त वजनदार ठरतो तो आपला पिझ्झा खाण्याचा मोह.. मग वजनाचे, आरोग्याचे सगळे नियम आपण धाब्यावर बसवतो आणि बिंधास्तपैकी पिझ्झावर ताव मारतो. मनसोक्त खाऊन झाल्यावर जेव्हा पिझ्झा पोटात जातो, तेव्हा मात्र मग उगाच पिझ्झा खाल्ला असा गिल्ट वाटू लागतो. प्रत्येक पिझ्झाप्रेमीचं असं कधी ना कधी होतंच.. म्हणूनच तर या बघा काही खास टिप्स. अनहेल्दी म्हणून आपण ज्याला नावं ठेवतो, तो पिझ्झाही होऊ शकतो हेल्दी. (pizza can be a healthy food)
पिझ्झा हेल्दी बनवायचा तर...
How to make healthy pizza
१. टोमॅटो सॉस आणि ओरिगॅनो
टोमॅटो सॉस आणि ओरिगॅनो हे दोन पदार्थ हेल्दी असतात. टोमॅटो सॉसमध्ये व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात असतं तर ओरिगॅनो हे अनेक हर्ब्सचं मिश्रण असतं. त्यामुळे पिझ्झाला इतर कोणताही सॉस कमी प्रमाणात लावा आणि त्या उलट टोमॅटो सॉसचं प्रमाण वाढवा. ऑरिगॅनोमध्ये असणारे पदार्थही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पोषक ठरतात. तसेच त्यामध्ये असणारा carvacrol हा घटक लिव्हरचं कार्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे जेव्हा पिझ्झा खाल तेव्हा त्यावर ओरिगॅनोही भरपूर प्रमाणात टाका.
२. पिझ्झा टॉपिंग्स
तुमचा पिझ्झा किती हेल्दी होणार हे ठरविण्यासाठी हा एक मुख्य भाग आहे. त्यामुळे तुमच्या पिझ्झाचं टॉपिंग तुम्ही स्वत: निवडा. यामध्ये जास्तीतजास्त पनीरचा वापर केला तर नक्कीच तुमचा पिझ्झा प्रोटीन रिच होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्वीटकॉर्न, हिरवी सिमला मिरची, टोमॅटो यांचा पिझ्झावरील वापरही वाढवा.
३. whole-grain पिझ्झा खा
पिझ्झा हा मैद्यापासून तयार झालेला असतो, तोच त्याचा सगळ्यात मोठा तोटा. त्यामुळेच तर तो पचनासाठी आणि एकंदरीतच आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही. म्हणूनच मैद्याचा बेस असणारा पिझ्झा घेण्याऐवजी whole-grain पिझ्झा किंवा गव्हाच्या पीठापासून तयार झालेला पिझ्झा खा. कारण अशा पिझ्झामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनासाठी तो सोपा असतो. त्यातही शक्यतो थीन क्रस्ट पिझ्झा खावा. कारण साध्या पिझ्झाच्या तुलनेत थीन क्रस्ट पिझ्झाच्या माध्यमातून खूप कमी कॅलरीज पोटात जातात.
४. चीज पिझ्झा असेल तर...
पिझ्झाचा तुकडा उचलल्यानंतर किंवा तो तोडल्यानंतर त्यातून तारेसारखं तुटणारं चीज हेच तर खरं अनेकांसाठी पिझ्झा खाण्याचं आकर्षण असतं. त्यामुळे पिझ्झावर जेव्हा चीज घ्याल तेव्हा ते लो फॅट चीज असावं. चीज हा दुग्धजन्य पदार्थ असल्याने त्यातून उत्तम प्रमाणात कॅल्शियम मिळतं. चीज पिझ्झाच्या एका स्लाईसमध्ये जवळपास २१९ मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, असं मानलं जातं. त्यामुळे पिझ्झावर चीज घ्या, पण ते low fat असेल, याची खात्री मात्र करून घ्या.