Join us  

वजन वाढू नये म्हणून बटाटा बंद? पाहा बटाटे नेमके कसे खावेत, वजनच वाढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 5:57 PM

Potatoes Healthy or Unhealthy : रिसर्चनुसार बटाटा हेल्दी आणि पोषक तत्वांनी परीपूर्ण असतो. यात फायबर्स, पोटॅशियम, आयर्न, व्हिटामीन सी आणि व्हिटामीन ६ भरपूर असते.

 भारतात बऱ्याच पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो. बटाटा हा एक असा पदार्थ आहे जो कोणताही भाजीत घातल्यानं त्या भाजीची चव आणि महत्व अधिक वाढते. (Health Tips) हेल्दी डाएटमध्ये बटाट्याचा समावेश करावा की नाही याबाबत लोकांच्या मनात कायम शंका असते. बटाटा खाल्ल्यानं वजन वाढतं, बटाटा रोज खाल्ल्यानं  शरीर जाड दिसतं असं अनेकाचं म्हणणं असतं. खरंच बटाटा खाल्ल्यानं वजन वाढतं का, बटाटा शरीरासाठी कितपत फायदेशीर ठरतो, ते समजून घेऊया. (Right Way to eat potato)

रिसर्चनुसार बटाटा हेल्दी आणि पोषक तत्वांनी परीपूर्ण असतो. यात फायबर्स, पोटॅशियम, आयर्न, व्हिटामीन-सी आणि व्हिटामीन ६ भरपूर असते. काहीजण बटाटा खाणं अन्हेल्दी मानतात. एक्सपर्ट्सच्या मते बटाटा शिजवण्याची पद्धत योग्य नसल्यामुळे अनेकांमध्ये असा गैरसमज असतो. (Is eating potatoes daily good for your health)

जर तुम्ही बटाटा डिप फ्राय करत असाल तर तो अन्हेल्दी ठरतो. म्हणूनचच जेव्हा तुम्ही फ्रेंच फ्राईस खाता तेव्हा बटाटा अन्हेल्दी बनतो. यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. जर तुम्हाला हेल्दी बटाटा खायचा असेल तर बेक करून किंवा  उकळून बटाटा खा. बटाटा हलका फ्राय केल्यामुळे त्याची पौष्टीकता कमी होत नाही. (Are potatoes healthy or unhealthy)

रोज बटाटा खाल्ल्ल्याने काय होते?

एक्सपर्ट्सच्यामते हेल्दी पद्धतीनं बटाटा शिजवला तर यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. रोज बटाटा खाल्ल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. यातील फायबर्स,  पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.  बटाटा तुम्ही कोणत्या पद्धतीनं शिजवता हे सुद्धा महत्वाचं असतं. यामुळे त्याची पौष्टीकता कमी होत नाही आणि वजनही वाढत नाही.

जास्त प्रमाणात खाल्ल्यानं वजन वाढू शकतं. बटाटा खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. यात कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे मेंदू आणि शरीराची कार्यक्षमता वाढते. जे लोक व्यायाम करतात त्यांना कार्बोहायड्रेट्सची जास्त गरज असते. चांगल्या पचनासाठी कार्बोहायड्रेट्स महत्वाचे असतात. यामुळे हाडांचे आरोग्यही चांगले राहते.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स