Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > त्वचेवर येईल ब्रायडल ग्लो... घ्या एक खास ज्यूस! दिसाल सुंदर आणि आरोग्यासाठीही फायदेशीर 

त्वचेवर येईल ब्रायडल ग्लो... घ्या एक खास ज्यूस! दिसाल सुंदर आणि आरोग्यासाठीही फायदेशीर 

Special Food For Glowing Skin: त्वचा सुंदर- चमकदार व्हावी, यासाठी हा एक खास उपाय करून बघा. त्वचेला ब्रायडल ग्लो मिळवून देणारा हा उपाय आरोग्यासाठीही निश्चितच पोषक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 06:15 PM2022-11-26T18:15:33+5:302022-11-26T18:15:59+5:30

Special Food For Glowing Skin: त्वचा सुंदर- चमकदार व्हावी, यासाठी हा एक खास उपाय करून बघा. त्वचेला ब्रायडल ग्लो मिळवून देणारा हा उपाय आरोग्यासाठीही निश्चितच पोषक आहे.

Pre bridal juice for glowing skin, Special healthy juice for radiant flawless skin | त्वचेवर येईल ब्रायडल ग्लो... घ्या एक खास ज्यूस! दिसाल सुंदर आणि आरोग्यासाठीही फायदेशीर 

त्वचेवर येईल ब्रायडल ग्लो... घ्या एक खास ज्यूस! दिसाल सुंदर आणि आरोग्यासाठीही फायदेशीर 

Highlightsहा ज्यूस नियमितपणे काही दिवस रोज सकाळी रिकाम्यापोटी घेतल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

त्वचा चमकदार- नितळ असावी, असं प्रत्येकीलाच वाटत असतं. काही जणींची त्वचा मुळातच उत्तम असते. त्यामुळे खूप काळजी  न घेताही त्यांची त्वचा चमकदारच दिसते. पण त्याउलट काही जणींना मात्र त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कधी कधी आहारातून पुरेशा पौष्टिक गोष्टी न मिळाल्यानेही त्वचेचा पोत बिघडतो. अशावेळी त्वचेवर केवळ क्रिम आणि वेगवेगळे  कॉस्मेटिक्स लावून उपयोग नसतो. अशा त्वचेला चमकदार- नितळ ( Home remedies for radiant flawless skin) करण्यासाठी आहारातूनच काही पौष्टिक गोष्टी मिळणं गरजेचं असतं. म्हणूनच त्वचेला ब्रायडल ग्लो (Pre bridal juice for glowing skin) देणारा हा एक उपाय करून बघा.

 

सुंदर- चमकदार त्वचेसाठी खास ज्यूस..
हा उपाय इन्स्टाग्रामच्या nuttyovernutritionn या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये काही भाज्या आणि फळं यांचा वापर करून एक आरोग्यदायी ज्यूस कसा तयार करायचा हे सांगण्यात आलं आहे.

बाळाला कडेवर घेऊन आईचा रॅम्प वॉक, पाहा मॉडेल अलिशा ओरावचा व्हायरल व्हिडिओ

हा ज्यूस नियमितपणे काही दिवस रोज सकाळी रिकाम्यापोटी घेतल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. तसेच यात बऱ्याच भाज्या आणि फळं असल्याने हा ज्यूस आरोग्याच्या दृष्टीनेही निश्चितच उपयुक्त ठरणारा आहे. 

 

कसा करायचा ज्यूस?
१. हा ज्यूस करण्यासाठी आपल्याला अर्धे बीट, मध्यम आकाराच्या दुधी भोपळ्याचा पाव भाग, एक काकडी, अर्धे सफरचंद, अर्धे गाजर, एक आवळा, कढीपत्त्याची ४ ते ५ पाने, अर्धा ते एक पाणी एवढे साहित्य लागणार आहे.

शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाही, हे सांगणारी १० लक्षणं.. तुम्हालाही जाणवतात का आरोग्याच्या या तक्रारी?

२. भोपळा, काकडी, गाजर यांची साले काढून घ्या. तसेच त्यांच्यासकट सगळ्या फळांच्या आणि भाज्यांच्या लहान फोडी करून घ्या.

३. आता या सगळ्या चिरलेल्या भाज्या मिक्सरच्या भांड्यात टाका आणि थोडं पाणी टाकून त्याचा ज्यूस करून घ्या. 

४. हा ज्यूस गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.  


 

Web Title: Pre bridal juice for glowing skin, Special healthy juice for radiant flawless skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.