उन्हाळ्याची चाहूल लागली की आपोआप वार्षिक परीक्षांची आठवण यायला लागते. आपण वयाने वाढलेलो असतो, त्या शाळा- कॉलेजच्या सगळ्या परीक्षांच्या पार पुढे आलेलो असतो, पण तरीही उन्हाळा- परीक्षा अशा काही आठवणी हमखास येतातच. त्यात आणखी एक आठवण येते आणि जिभेवर नकळत चव रेंगाळते ती आई किंवा आजीच्या हाताने खाल्लेल्या दही- साखरेची. परीक्षेला घरातून बाहेर पडताना हमखास आईची किंवा आजीची हाक यायची आणि दही- साखर खाऊ घातले जायचे. हल्लीची शाळकरी मुलं क्वचितच असं काही करत असतील पण मागची पिढी मात्र याच अनुभवातून पुढे आलेली आहे.(Precident Draupadi Murmu Feeds Dahi Shakkar To Finance Minister Nirmala Sitaraman)
या दही- साखरेची पुन्हा आठवण येण्याचं कारण म्हणजे आज अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं. बजेट सादर करणं हा त्यांच्या आर्थिक वर्षातला महत्त्वाचा दिवस. या दिवसाची सुरुवात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दही- साखर खाऊन केली.
गूळ- खोबऱ्याचे मोदक तळताना कढईत फुटतात? ५ टिप्स, प्रत्येक मोदक होईल खमंग- कुरकुरीत
दोघींचे ते फोटो सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल झालेले आहेत. यानिमित्ताने अनेकांना त्यांनी लहानपणी परीक्षेला जाताना खाल्लेल्या दही-साखरेची आठवण आलीच असणार. तेव्हा दही- साखर का खायला पाहिजे हे कळायचे नाही आणि ते कोणाला विचारावे एवढे अनेकांना सुचायचेही नाही. म्हणूनच आता या विषयाच्या थोडं खोलावर जाऊया आणि दही- साखर खाण्याचे नेमके काय फायदे आहेत ते पाहूया..
दही साखर खाण्याचे फायदे
१. दही खाल्ल्याने मनाला, शरीराला शांत वाटते.
२. साखरेमधून ग्लुकोज मिळाले की त्यातून भरपूर उर्जा मिळते. दह्याचा थंडावा आणि साखरेतून मिळणारी उर्जा हे एक उत्तम मिश्रण आहे.
चेहऱ्यावर येईल सोन्यासारखा तेजस्वी ग्लो, १ हळकूंड घेऊन करा उपाय, पिंपल्स- ॲक्नेही गायब
३. दही हे उत्तम प्रोबायोटिक आहे. ते अन्नपचनासाठी मदत करते. त्यामुळे परीक्षा किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाताना आपले पोट शांत असेल तर आपण करू त्या कामात आपले लक्ष लागते आणि एकाग्रता वाढते.
४. दह्यामधून कॅल्शियम, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी १२, पोटॅशियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळते.
५. आयुर्वेदानुसार दही हे कफ वर्धक आहे. त्यामुळे मनावरचा ताण कमी करण्यासाठी दह्याची मदत होते.