Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ९० टक्के लोक 'ही' चूक करतात म्हणूनच त्यांना मिळत नाही डाळ-वरणातलं प्रोटीन! डाळी खायच्या तर..

९० टक्के लोक 'ही' चूक करतात म्हणूनच त्यांना मिळत नाही डाळ-वरणातलं प्रोटीन! डाळी खायच्या तर..

Proper Method Of Eating Dal For Getting Maximum Protein: शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी नुसतंच वाटीभर वरण खात असाल तर त्याचा काही उपयोग नाही.(correct way of eating dal and rice for getting enough protein)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 04:16 PM2024-11-27T16:16:28+5:302024-11-27T16:35:50+5:30

Proper Method Of Eating Dal For Getting Maximum Protein: शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी नुसतंच वाटीभर वरण खात असाल तर त्याचा काही उपयोग नाही.(correct way of eating dal and rice for getting enough protein)

proper method of eating dal for getting maximum protein, correct way of eating dal and rice for getting enough protein | ९० टक्के लोक 'ही' चूक करतात म्हणूनच त्यांना मिळत नाही डाळ-वरणातलं प्रोटीन! डाळी खायच्या तर..

९० टक्के लोक 'ही' चूक करतात म्हणूनच त्यांना मिळत नाही डाळ-वरणातलं प्रोटीन! डाळी खायच्या तर..

Highlightsडाळींमध्ये असणारे प्रोटीन्स शरीराला पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी डाळी किंवा कडधान्ये योग्य पद्धतीनेच खाल्ली गेली पाहिजेत..

बहुतांश शाकाहारी लोकांच्या आहारात प्रोटीन्सची कमतरता असतेच. त्यासाठी मग अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. डाळी, कडधान्ये हे प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत मानले जातात. त्यामुळे अनेक जण त्यांच्या आहारात भरपूर प्रमाणात डाळी आणि कडधान्ये घेतात. पण दुसरीकडे भात खाऊन वजन वाढतं, म्हणून मात्र भात खाणं टाळतात. शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हीही अशाच पद्धतीने वरण किंवा आमटी किंवा कडधान्यांची उसळ खात असाल तर तुम्ही चुकत आहात. कारण डाळींमध्ये असणारे प्रोटीन्स शरीराला पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी डाळी किंवा कडधान्ये योग्य पद्धतीनेच खाल्ली गेली पाहिजेत..(correct way of eating dal and rice for getting enough protein)

 

डाळींमधले प्रोटीन्स शरीराला मिळण्यासाठी

डाळींमध्ये असणारे प्रोटीन्स शरीराला मिळण्यासाठी त्या कशा पद्धतीने खाव्या, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी luke_coutinho या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की डाळी, कडधान्यांमध्ये लेयसिन हे अमिनो ॲसिड असतं.

कुंडीतली माती अधिक कसदार कशी करायची? १ सोपा उपाय- हिवाळ्यात बागेत फुलतील रंगबेरंगी फुलं

ते अमिनो ॲसिड तांदळात नसतं. पण त्याउलट भातामध्ये काही सल्फरयुक्त अमिनो ॲसिड जास्त प्रमाणात असतात जे डाळींमध्ये नसतात. त्यामुळे जेव्हा आपण डाळ आणि भात हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये अमिनो ॲसिडचा एक परिपूर्ण हिस्सा जातो जो शरीरातल्या प्रोटीन सिंथेसिस या क्रियेसाठी मदत करतो.

 

त्यामुळे प्रोटीन्स मिळण्यासाठी नुसतंच वरण किंवा नुसताच भात खाऊ नका. काही लोक अगदी थोडं वरण आणि भरपूर भात खातात. तसंही करू नका.

Thushi Bangles: कमी सोन्यामध्ये घ्या ठसठशीत ठुशी बांगडी, लग्नसराईसाठी करा देखणी खरेदी

भात आणि वरण या दोन्हींचं प्रमाण योग्य ठेवा. त्यामुळेच आपल्याकडे वरण भात, वरण पोळी, राजमा- चावल, डाळ- खिचडी. कडधान्यांची उसळ आणि पोळी किंवा भात हे काही सुपरहेल्दी फूड कॉम्बिनेशन्स मानले जातात.  


 

Web Title: proper method of eating dal for getting maximum protein, correct way of eating dal and rice for getting enough protein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.