Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > आंबा खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? आहारतज्ज्ञ सांगतात फक्त १ पथ्य पाळा- वजन कंट्रोलमध्ये...

आंबा खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? आहारतज्ज्ञ सांगतात फक्त १ पथ्य पाळा- वजन कंट्रोलमध्ये...

Proper Method Of Eating Mango For Weight Control: उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा खाण्याचा मोह होणं अगदी साहजिक आहे. पण वजन वाढीची चिंता करत असाल तर एवढं एक पथ्य मात्र नक्की पाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 05:18 PM2024-04-11T17:18:15+5:302024-04-11T17:19:14+5:30

Proper Method Of Eating Mango For Weight Control: उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा खाण्याचा मोह होणं अगदी साहजिक आहे. पण वजन वाढीची चिंता करत असाल तर एवढं एक पथ्य मात्र नक्की पाळा...

proper method of eating mango for weight loss, how to avoid weight gain by eating mango? | आंबा खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? आहारतज्ज्ञ सांगतात फक्त १ पथ्य पाळा- वजन कंट्रोलमध्ये...

आंबा खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? आहारतज्ज्ञ सांगतात फक्त १ पथ्य पाळा- वजन कंट्रोलमध्ये...

Highlightsआंबा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं किंवा वजन वाढू नये म्हणून आंबे खाताना कोणता नियम पाळायचा?

काही लोक वाढत्या वजनाच्या बाबतीत खूपच जास्त काटेकोर आणि शिस्तीचे असतात. वजन वाढू नये म्हणून ते बरेचसे पदार्थ खाणं टाळतात. पण फळांचा राजा आंबा जेव्हा समोर येतो, तेव्हा मात्र खाण्यापिण्याचे सगळे नियम गळून पडतात. पिकलेल्या आंब्याचा रसाळ सुगंध आजूबाजूला दरवळू लागला की कधी तो आंबा घेतो आणि खातो असं होऊन जातं. तुम्हालाही आंबे खाण्याचा असाच खूप मोह होत असेल, पण त्याचवेळी वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल तर आंबे खाताना फक्त एक नियम कटाक्षाने पाळा (proper method of eating mango for weight loss). तेवढं केलं तर आंबे खाऊनही तुमचं वजन वाढणार नाही. (how to avoid weight gain by eating mango?)

 

आंबा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं किंवा वजन वाढू नये म्हणून आंबे खाताना कोणता नियम पाळायचा याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी amitagadre या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

कस्टमाईज मंगळसूत्र पेंडंटचा भन्नाट ट्रेण्ड, सांगा तुम्हाला कोणतं आवडलं?

यामध्ये त्या सांगतात की वजन वाढू नये यासाठी तुम्ही एक लहान ते मध्यम या आकाराचा एक आंबा खाऊ शकता. म्हणजे साधारण १०० ते १५० ग्रॅम वजन असणारा आंबा. पण त्यापेक्षा जास्त मात्र खाऊ नका...

 

हे देखील लक्षात घ्या

आंबा खाल्ल्याने वजन वाढू नये किंवा आंबा खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास वाढू नये यासाठी तो नेहमी जशा स्वरुपात आहे, तशाच स्वरुपात खायला पाहिजे.

भारतातल्या बहुतांश प्रोटीन पावडर आरोग्यासाठी घातक, नवीन संशोधन म्हणते- सावध व्हा कारण..

आंब्याचा रस करून, लस्सी किंवा मिल्कशेक करून आंबा खाणं टाळा. यामुळे त्यात इतर अनेक पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे वजन वाढण्याची, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते. 


 

Web Title: proper method of eating mango for weight loss, how to avoid weight gain by eating mango?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.