Join us  

ऐन तारुण्यात गुडघे-कंबर दुखतेय? भरपूर कॅल्शियम देणारा ‘हा’ सोपा उपाय, १५ दिवसांत अशक्तपणा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 10:09 AM

Protein Calcium and Iron Rich Laddu Recipe (Foods For Calcium) : शरीराला मजबूत बनवण्यासाठी आणि आजारांपासून लढण्यासाठी प्रोटिन्स, आयर्न, कॅल्शियम यांसारख्य पोषक तत्वांची आवश्यकता असते.

सतत थकवा येतो, कमकुवपणा अंगात रक्त कमी होणं असे त्रास आजकाल प्रत्येकालाच जाणवतात. जर तुम्ही हेल्दी नाश्ता,पोटभर जेवण करत असाल आणि तरीही शरीर कमकुवत होत असेल. (Food for Calcium and Protein) शरीरात पोषक तत्वांची कमतरता असू शकते. यामुळे  खाल्लेलं अंगाला व्यवस्थित लागत नाही.  शरीराला मजबूत बनवण्यासाठी आणि आजारांपासून लढण्यासाठी प्रोटिन्स, आयर्न, कॅल्शियम यांसारख्य पोषक तत्वांची आवश्यकता असते. (Protein Calcium and Iron Rich Laddu Recipe)

जेव्हा ही तत्व शरीराला मिळत नाही तेव्हा शरीर आतून पोकळ होत जाते. शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर नीताषा गुप्ता यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. शरीरातील आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. ज्यामुळे १५ दिवसांत तुमचा कमकुवतपणा दूर होईल.

सकाळी वॉक करता तरी पोट कमी होईना? वेट लॉससाठी वॉक करताना खाऊन जायचं की नाही-तज्ज्ञ सांगतात

थकवा आणि कमकुवतपणा कसा घालवायचा?

जर थोडं काम केलं तरी तुम्हाला लगेच थकवा येत असेल किंवा कंबरदुखी, डोकेदुखीचा त्रास  होत असेल हा उपाय तुमचं काम अधिक सोपं करेल आणि मेंदूची कार्यक्षमताही सुधारेल. हा उपाय महिला आणि पुरूषांव्यतिरिक्त लहान मुलांसाठीही फायदेशीर ठरतो महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याची अनेक उदाहरणं आहेत. ज्या मुलांची उंची वाढत नाही आणि खेळताना लवकर थकून जातात यांनी याचे सेवन करायला हवे. 

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ५० ग्राम अखरोटची पावडर,  ५० ग्राम खरबूजाच्या बियांची पावडर, ५० ग्राम शेंगदाण्याचे कूट, १०० ग्राम भाजलेल्या चण्याचे पीठ आणि ५० ग्राम मनुक्यांची आवश्यकता असेल. हे सर्व पदार्थ साजूक तुपात व्यवस्थित भाजून घ्या. भाजलेले चणे मिक्सरमध्ये  घालून त्याची पावडर बनवून व्यवस्थित दळून घ्या. 

सद्गगुरू सांगतात जेवताना कसं, किती खावं याचे ५ नियम; वजन कंट्रोलमध्ये राहील-आजारही दूर

नंतर एकामागोमाग एक सर्व वस्तू दळून घ्या. हे सर्व मिसळून एक लाडू तयार करून घ्या. महिन्याभर  तुम्ही ही पावडर स्टोअर करून ठेवू शकता.  रोज या मिश्रणाचा एक लाडू खाऊ शकता किंवा दुधाबरोबर याचे सेवन करा. लहान मुलांना तुम्ही अर्धा लाडू देऊ शकता. कारण हे शरीरासाठी गरम असते. याच्या सेवनाने १५ दिवसांत तुम्हाला फरक जाणवू लागेल.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स