वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करणं गरजेचं असते. अन्हेल्दी पदार्थांपासून दूर राहून आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही सहज वजन कमी करू शकता. (Protein Ladoo Energy Ball Recipe) ज्या पदार्थांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ खाल्ल्याने बराचवेळ पोट भरल्यासारखे राहते आणि अन्हेल्दी पदार्थ खाण्याचे क्रेव्हींग्स होत नाही. लवकर वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी शरीरात हेल्दी न्युट्रिएंट्स पोहोचणं आणि क्रेव्हिंग्स कंट्रोल होणं गरजेचे असते. याचा अर्थ असा नाही की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहावे लागेल. (Protein Laddu for Weight Loss)
रोजच्या नाश्त्याला एक लाडू खाऊन तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहील. शरीरात मह्त्वाच्या न्युट्रिएंट्सची कमतरता दूर होईल आणि वजन कमी करण्यासही मदत होईल. डायटिशिनय सिमरन यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to Make Healthy Protein Ladoo For weight Loss)
नाचणीच्या पीठाचा लाडू वजन कमी करण्याचा एक चांगला स्त्रोत आहे. यात फायबर्स जास्त प्रमाणात असते. हा लाडू ग्लुटेन फ्री असतो. त्यामुळे हा लाडू पचवणं फार सोपं असते. शरीरात कॅल्शियमची कमतरता भासल्यास हा लाडू खाणं फायदेशीर ठरते. मेनोपॉज, हॉर्मोनल इम्बॅलेंस आणि पीएमएसची लक्षणं कमी करण्यासाठी या लाडूचे सेवन करा. बदलत्या वातावरणात गंभीर आजारांचा सामना करावा लागतो अशावेळी इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी हा लाडू खाणं फायद्याचं ठरेल.
या लाडूंमध्ये काजू, बदाम, अक्रोडचा वापर केला जातो. यातील हेल्दी फॅट्स शरीराला एनर्जी देतात आणि पोट दीर्घकाल भरलेलं ठेवण्यास मदत करतात. ज्या लोकांना थकवा, कमकुवतपणा जाणवतो त्यांनी दिवसभरात १ ते २ लाडू खायला हवेत. हे लाडू खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि क्रेव्हिग्स होत नाहीत.
पौष्टीक नाचणीच्या लाडूंची रेसिपी
नाचणीचे पीठ - १ वाटी
नट्स आणि ड्रायफ्रुट्स- मूठभर
गुळाची पावडर- अर्धी वाटी
साजूक तूप- १ मोठा चमचा
1) हे लाडू करण्याच्या सुरूवातीला नट्स आणि सिड्स व्यवस्थित भाजून घ्या. ड्रायफ्रुट्सचे हे मिश्रण वाटून वेगळे ठेवा. पॅनमध्ये साजूक तूप आणि नाचणीचे पीठ घाला.
2) नाचणीचे पीठ व्यवस्थित भाजले गेल्यानंतर त्यात गुळ पावडर घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. त्यात ड्रायफ्रुट्सची पावडरसुद्धा घाला. पीठाचा सुंगध यायाला सुरूवात झाल्यानंतर गॅस बंद करा आणि या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. सकाळ