वजन (Weight Loss) कमी करण्यासाठी आहारात बदल करणं फार महत्वाचे असते. (Weight Loss Laddu Recipe) अन्हेल्दी पदार्थ आहारातून वगळून हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. ज्या पदार्थांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ खाल्ल्याने पोट दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि अन्हेल्दी खाण्याची क्रेव्हिंग्स कंट्रोल होते. (Protein Laddu for Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी जास्त वेळ उपाशी न राहता मध्येमध्ये खात राहालयला हवं. रोज सकाळ संध्याकाळ नाश्त्याला एक लाडू खाल्ला तर शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. वजनही वेगाने कमी होण्यास मदत होईल आहारतज्ज्ञ सिमरन यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Ragi Laddu For Weight Loss)
नाचणीचे लाडू खाल्ल्याने काय फायदे होतात?
1) नाचणीचे पीठ वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरते. यात फायबर्स जास्त प्रमाणात असते. ग्लुटेन फ्री असते आणि पचवणं सोपं होतं. शरीरात कॅल्शियमची कमतरता भासल्यासही हे लाडू खाणं फायदेशीर ठरतात. मेनोपॉझ, हॉर्मोनल बॅलेंन्स, पीएमएसची लक्षणं कमी करण्यासाठी हा लाडू नक्की खा. बदलत्या वातावरणात आजार होतात अशावेळी हे लाडू खाल्ल्याने इम्यूनिटी बुस्ट करण्यासही मदत होते. यात काजू, बदाम आणि अख्रोडचा वापर केला जातो.
थंडीत इडलीचे पीठ जराही फुलत नाही? डाळ-तांदूळ दळताना हा पदार्थ घाला, मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या
2) हेल्दी फॅट्स यात मोठ्या प्रमाणात असतात. ड्राय फ्रूट्स शरीराला एनर्जी देतात आणि पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. ज्या लोकांना थकवा, कमकुवतपणा जाणवतो त्यांनी दिवसाला १ ते २ लाडू खायला हवेत. हे लाडू खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे अन्हेल्दी खाण्याची क्रेव्हिंग्स होत नाही.
हेल्दी राहण्यासाठी नाचणीचे लाडू कसे बनवावेत? (How to Make Ragi Laddu)
1) नाचणीचे पीठ- १ वाटी
2) नट्स, सीड्स- २ वाट्या
3) गुळ पावडर- अर्धा कप
4) साजूक तूप- १ चमचा
1) हे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी नट्स आणि सीड्स बारीक करून घ्या. ड्रायफ्रुट्स बारीक करून वेगळे ठेवा.
2) गॅसवर तूप ठेवून त्यात नाचणीचे पीठ घाला.
बटाट्याचे साल फेकता कशाला? सालीचे कुरकुरीत चिप्स करा, सोपी रेसिपी-आवडीने खातील सगळे
3) नाचणीचे पीठ व्यवस्थित भाजून घ्या, यात गुळाची पावडर घाला, ड्रायफ्रुट्स घालून एकजीव करून घ्या.
4) थंड झाल्यानंतर लाडू वळून घ्या. हे लाडू तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता.