Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्रोटीन हवं तर महागाईमुळे खिशाला परवडत नाही? रोज हे ७ व्हेज पदार्थ खा, बिंधास्त करा प्रोटीन डाएट

प्रोटीन हवं तर महागाईमुळे खिशाला परवडत नाही? रोज हे ७ व्हेज पदार्थ खा, बिंधास्त करा प्रोटीन डाएट

Protein Rich Breakfast : शरीराला आयर्न, फायबर्सप्रमाणेच प्राोटीन्सचीही आवश्यकता असते.  प्रोटीन्स पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे पूर्ण दिवस पोट भरललेलं वाटतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 09:08 AM2023-09-07T09:08:00+5:302023-09-07T14:37:52+5:30

Protein Rich Breakfast : शरीराला आयर्न, फायबर्सप्रमाणेच प्राोटीन्सचीही आवश्यकता असते.  प्रोटीन्स पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे पूर्ण दिवस पोट भरललेलं वाटतं.

Protein Rich Breakfast : Protein rich breakfast to keep the body fit and healthy | प्रोटीन हवं तर महागाईमुळे खिशाला परवडत नाही? रोज हे ७ व्हेज पदार्थ खा, बिंधास्त करा प्रोटीन डाएट

प्रोटीन हवं तर महागाईमुळे खिशाला परवडत नाही? रोज हे ७ व्हेज पदार्थ खा, बिंधास्त करा प्रोटीन डाएट

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि काही बदल दिसून येत नसे तर तुम्ही दिवसाची सुरूवात प्रोटीन्सयुक्त नाश्त्याने करायला हवी. यामुळे तुमचं वजन कमी होईल आणि काम करण्यासाठी उर्जा, ताकद मिळेल. शरीराला आयर्न, फायबर्सप्रमाणेच प्राोटीन्सचीही आवश्यकता असते.  प्रोटीन्स पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे पूर्ण दिवस पोट भरललेलं वाटतं. (Protein Rich Breakfast) ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते. याच्या सेवनानं फक्त भूक कमी होत नाही तर फॅट सुद्धा जमा होत नाही.हेल्दी आणि फिट राहण्यास मदत होते. ( Protein rich breakfast to keep the body fit and healthy)

प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे कमकुवतपणा आणि अशक्तपणा येऊ शकतं. पुरूषांना रोज ५० ग्राम प्रोटीन्सची आवश्यकता असते तर महिलांना ४६ ग्राम प्रोटीन्सची आवश्यकता असते.  बॉडीबिल्डींग करणाऱ्या एथलीट्सना प्रोटीन्सची गरज जास्त असते. न्युट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल यांनी प्रोटीन्सयुक्त पदार्थांबद्दल सांगितले आहे.  या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करायला हवा. 

पालक

नाश्त्याला तुम्ही पालक सॅण्डविच किंवा पालकाच्या वड्या खाऊ शकता. दुपारच्या जेवणात पालक सूप हा उत्तम पर्याय आहे. पालक-पनीर किंवा पालक पनीर बुर्जीसुद्धा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. 

मशरूम

मशरूमधून तुम्हाला ३० ग्राम प्रोटीन मिळते. मशरूममध्ये कमी कॅलरीज असतात.  यात प्रोटीन्स व्यतिरिक्त आयर्न, कॅल्शियम आणि फायबर्स असतात. मशरूम सॅण्डवीच किंवा भाजीच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता. 

पीनट बटर, केलं

यातून तुम्हाला  १४ ग्राम प्रोटीन्स मिळतील.  हे बनवण्यासाठी तुम्हाला ओट्स, मीठ, केल, पीनट बीटर, बदाम, एगेन सिरपची आवश्यकता असेल. सकाळी अगदी कमीत कमी वेळात तुम्ही हे तयार करू शकता.  शेंगदााण्यांमध्ये जवळपास  ९० ते १०० कॅलरीज असतात. ४ ग्राम प्रोटीन्स आणि ८ ग्राम फॅट्स असतात. 

स्प्राऊट्स चाट

नाश्त्याला काही हेल्दी खायचं असेल तर तुम्ही राजमा, मूग डाळ, काळे चणे यांसारखे पदार्थ खाऊ शकता. याची चव आणि पोषण वाढवण्यासाठी  त्यात कांदा, टोमॅटो,  हिरवी मिरची, आलं यांसारखे पदार्थ घाला.

पनीर बुर्जी

पनीर, हा एक मलईदार आणि स्वादीष्ट पदार्थ आहे.   चवीबरोबरच पोषणही मिळते. सकाळी नाश्त्यामध्ये चपाती किंवा ब्रेडबरोबर तुम्ही पनीर बुर्जी खाऊ शकता. पनीर प्रोटीन आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. 

बेसन चिला

भारतात बेसन चिला हा सगळ्यात आवडत्या नाश्त्यापैकी एक आहे. चण्याच्या डाळीपासून बनवलेला हा नाश्ता पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यात तुम्ही पनीरचं स्टफिंग घालू शकता. चणे प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहेत. तुम्ही बेसन चिला दही किंवा लोचण्याबरोबर खाऊ शकता. 

उपमा

उपमा हा एक हेल्दी नाश्त्याच्या पदार्थ आहे. यामुळे फक्त उर्जा मिळत नाही तर प्रोटीन्सची कमतरताही दूर होते. तुम्ही उपमा बनवतााना त्यात शेंगदाणे, वाटाणे किंवा मुगाची डाळही घालू शकता. जेणेकरून त्याची पौष्टीकता अधिक वाढेल.

Web Title: Protein Rich Breakfast : Protein rich breakfast to keep the body fit and healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.