Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थंडीत प्रोटीन पावडरी विकत आणताय? ‘हे’ ३ शाकाहारी पदार्थ खा, भरपूर नैसर्गिक प्रोटीन स्वस्तात मस्त...

थंडीत प्रोटीन पावडरी विकत आणताय? ‘हे’ ३ शाकाहारी पदार्थ खा, भरपूर नैसर्गिक प्रोटीन स्वस्तात मस्त...

Protein Rich Food For Vegetarians : The Best Protein Sources for Vegetarians : Top Vegetarian Protein Sources : Veg Food Protein Rich Foods : शाकाहारी पदार्थात प्रोटीनचे पर्याय कमी आहेत असं कोण म्हणतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 02:51 PM2024-11-14T14:51:55+5:302024-11-14T14:53:48+5:30

Protein Rich Food For Vegetarians : The Best Protein Sources for Vegetarians : Top Vegetarian Protein Sources : Veg Food Protein Rich Foods : शाकाहारी पदार्थात प्रोटीनचे पर्याय कमी आहेत असं कोण म्हणतं?

Protein Rich Food For Vegetarians The Best Protein Sources for Vegetarians Top Vegetarian Protein Sources | थंडीत प्रोटीन पावडरी विकत आणताय? ‘हे’ ३ शाकाहारी पदार्थ खा, भरपूर नैसर्गिक प्रोटीन स्वस्तात मस्त...

थंडीत प्रोटीन पावडरी विकत आणताय? ‘हे’ ३ शाकाहारी पदार्थ खा, भरपूर नैसर्गिक प्रोटीन स्वस्तात मस्त...

'प्रोटीन्स' हा आपल्या रोजच्या आहारातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण बऱ्याच लोकांचा आहार व्यवस्थित नसल्याने शरीरात प्रोटीन्सची कमतरता निर्माण होते. अशावेळी आपल्या शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरुन काढण्यासाठी आपण महागडे प्रोटीन्स शेक पिण्याचा सोपा मार्ग निवडतो.  यासोबतच शाकाहारी जेवणातून पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स मिळत नाहीत, असा अनेकांचा गैरसमज असतो. यासाठीच आपण आपल्या शरीरातील प्रोटिन्सची कमतरता भरुन काढण्यासाठी इतर शाकाहारी पदार्थांकडे दुर्लक्ष करुन विकतचे महागडे प्रोटीन्स शेक, पावडर खाणे पसंत करतो(Top Vegetarian Protein Sources).

जेव्हा आपण प्रोटिन्सचा विचार करतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे पुरेसे प्रोटिन्स मिळण्यासाठी मांसाहारी पदार्थ खाणे. पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर आपल्या शरीरातील प्रोटिन्सची गरज कशी भरुन काढावी ? असा कॉमन प्रश्न सगळ्यांनाच पडतो. न्यूट्रिशनिस्ट आणि ACE हेल्थ कोच गुंजन तनेजा यांनी शाकाहारी असणाऱ्यांसाठी शरीरातील प्रोटिन्सची (Top Vegetarian Protein Sources) कमतरता भरुन काढण्यासाठी कोणते पदार्थ खावेत हे सांगितले आहे. न्यूट्रिशनिस्ट गुंजन तनेजा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत कोणत्या शाकाहारी पदार्थांतून सर्वात जास्त प्रोटिन्स मिळते याबाबत अधिक माहिती शेअर केली आहे(The Best Protein Sources for Vegetarians).

१.  रोजच्या आहारात प्रोटिन्स घेणे महत्वाचे आहे का ? 

रोजच्या आहारात प्रोटिन्स घेतल्याने तुम्हाला उत्साही वाटेल. यासोबतच निरोगी व योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी प्रोटिन्स घेणेही महत्त्वाचे आहे.  आपल्या शरीरातील हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी देखील प्रोटिन्स घेणे महत्त्वाचे आहे.

रोजचा आहार प्रोटीनयुक्त करण्यासाठी नेमके काय करावे ?

१. रोजच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा :- आपल्या रोजच्या आहारातून पुरेसे प्रोटिन्स मिळावे यासाठी जेवणातील वेगवेगळ्या पदार्थांमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ मिक्स करावेत. जसे की, रोजच्या भाज्या आणि भातामध्ये पनीर, टोफू, चीझ, सोयाबीन मिक्स करावेत. चपात्या तयार करताना त्यात सोयाबीन पावडर मिक्स करुन घालावी. यासोबतच, पराठा करताना पराठ्याचे स्टफिंग तयार करताना त्यात पनीर, टोफू, चीझ, सोयाबीन यांचे लहान तुकडे मिक्स करावेत. हा उपाय केल्याने नकळतपणे आपल्या रोजच्या आहारातून प्रोटिन्स आपल्या शरीराला मिळते. 

२. बेसन किंवा सातूच्या पिठाचा वापर करणे :- आपल्या शरीराला आवश्यक असा प्रोटिन्सचा डेली डोस पूर्ण करण्यासाठी बेसन आणि सातूच्या पिठाचा वापर करावा. रोजच्या आहारात भाजलेले बेसन पीठ आणि सातूच्या पिठाचा वापर करणे फायदेशीर ठरेल. बेसन आणि सातूच्या पिठात प्रोटिन्स सोबतच इतर देखील शरीराला आवश्यक अशी खनिजे फार मोठ्या प्रमाणांत असतात. चपाती किंवा पराठ्यासाठीचे पीठ मळताना त्यात चमचाभर बेसन किंवा सातूचे पीठ घालावे. यासोबतच, तुम्ही सातूच्या पिठाचा वापर करुन त्याचे पौष्टिक पराठे देखील तयार करु शकता. 

तासंतास उभं राहून घरातील काम करताय? करा २ सोपे एक्सरसाइज, पाय-टाचा दुखणार नाही, मिळेल आराम...


विद्या बालनने केलेलं 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट नेमकं काय? काय खाल्लं म्हणून उतरलं वजन सरसर...

३. रोजच्या आहारात डाळ आणि कडधान्यांचा समावेश करावा :- न्यूट्रिशनिस्ट गुंजन तनेजा यांच्या मते, रोजच्या आहारात किमान एका प्रकारची डाळ आणि कडधान्यांचा समावेश करावा. राजमा, चणे, छोले यांसारखी वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आपण रोज खाऊ शकता. रोजच्या आहारासोबत कोणत्याही एक प्रकारचे कडधान्य एक बाऊलभरून खावे, यामुळे आपल्या शरीराला आवश्यक तितके प्रोटिन्स मिळण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात चणा, राजमा किंवा छोले उकडवून कोशिंबीरमध्ये घालून देखील खाऊ शकता.

Web Title: Protein Rich Food For Vegetarians The Best Protein Sources for Vegetarians Top Vegetarian Protein Sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.