Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सुंदर डोळे हवेत, नजर उत्तम हवी तर भोपळा खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय भोपळा खाण्याचे फायदे

सुंदर डोळे हवेत, नजर उत्तम हवी तर भोपळा खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय भोपळा खाण्याचे फायदे

Health tips: डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर भोपळा खाणं उत्तम आहेच.. पण त्यासोबतच अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेले लाल भोपळा खाण्याचे इतर फायदेही बघा... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 01:04 PM2022-01-27T13:04:15+5:302022-01-27T13:05:29+5:30

Health tips: डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर भोपळा खाणं उत्तम आहेच.. पण त्यासोबतच अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेले लाल भोपळा खाण्याचे इतर फायदेही बघा... 

Pumpkin is healthy for improving eye sight, Actress Bhagyashree says benefits of eating pumpkin | सुंदर डोळे हवेत, नजर उत्तम हवी तर भोपळा खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय भोपळा खाण्याचे फायदे

सुंदर डोळे हवेत, नजर उत्तम हवी तर भोपळा खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय भोपळा खाण्याचे फायदे

Highlightsभोपळ्यामध्ये लोहदेखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ज्यांना रक्ताशयाचा त्रास आहे किंवा जे लोक ॲनिमिक आहेत, त्यांनी आहारात नियमितपणे भोपळ्याचे वेगवेगळे पदार्थ घ्यावेत. 

भोपळा, गवारीच्या शेंगा, दोडकं, शेपू या अशा काही भाज्या काही जणांच्या इतक्या नावडत्या असतात, की त्या भाज्यांची चव चाखून बघणं तर दूर, पण त्या ताटात वाढून घेणंही अनेकांना आवडत नाही.. पण कितीही नकोसं असलं वाटत असलं तरी गोल- मटोल दिसणारा भोपळा आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे असं सांगतेय अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree). ती म्हणते तसं डोळ्यांसाठी (pumpkin is beneficial for eyes) तर भोपळा चांगला आहेच, पण त्यासोबतच भोपळा खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात. 

 

मराठी अभिनेत्री भाग्यश्री सोशल मिडियावर (social media) बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असते. ती तिच्या इन्स्टाग्राम पेजवर आठवड्यातून एक दिवस काही हेल्थ टिप्स शेअर करत असते.. या टिप्स तिच्या चाहत्यांमध्ये चांगल्याच लोकप्रिय असून तिचे चाहते भाग्यश्री या आठवड्यात आरोग्याविषयी नविन काय माहिती देणार याकडे लक्ष ठेवूनच असतात. त्यानुसार आता भाग्यश्रीने या आठवड्यात तिच्या चाहत्यांना भोपळा खाण्याचा सल्ला दिला आहे. ती म्हणते डोळ्यांचं आरोग्य सुधारायचं असेल, तर भाेपळा खायलाच पाहिजे..

 

सध्या स्क्रिन टाईम वाढल्याने लहान मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी खूप जास्त वाढल्या आहेत.. घरोघरी मुलांच्या आई याबाबत चिंताग्रस्त आहेत. शाळा, ट्यूशन असं सगळं काही आता ऑनलाईनच असल्याने अगदी प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांनाही नाईलाजाने दिवसातून ५ ते ६ तास स्क्रिनवर घालवावेच लागतात. त्यामुळे लॉकडाऊननंतर मुलांची नजर कमजोर होऊन त्यांना चष्मा लागण्याचे प्रमाणही खूप जास्त वाढले आहे. म्हणूनच मुलांची नजर सुधारण्यासाठी त्यांना भोपळ्याचे वेगवेगळे पदार्थ खायला द्यावेत, असा सल्ला भाग्यश्रीने दिला आहे. 

 

भोपळा खाण्याचे फायदे (Benefits of eating pumpkin)
- भोपळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ज्यांना पचनाचा त्रास असेल, त्यांनी नियमितपणे भोपळा खाल्ला पाहिजे. भोपळ्यामध्ये असणारे फायबर पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. 
- भोपळ्यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. त्याउलट फायबर जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे भोपळा खाल्ल्यामुळे शरीरात खूप काळ उर्जा टिकून राहते आणि पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठीही लाल भोपळ्याचे वेगवेगळे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. 


- लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमीन A, E आणि C मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढविण्यासाठी लाल भोपळा खावा.
- भोपळ्यामध्ये लोहदेखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ज्यांना रक्ताशयाचा त्रास आहे किंवा जे लोक ॲनिमिक आहेत, त्यांनी आहारात नियमितपणे भोपळ्याचे वेगवेगळे पदार्थ घ्यावेत. 
- भोपळा खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हृदयासाठी भोपळा खाणे चांगले आहे. 

 

Web Title: Pumpkin is healthy for improving eye sight, Actress Bhagyashree says benefits of eating pumpkin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.