वजन कमी करणं सध्याची एक मोठी समस्या बनले आहे. (Weight Loss Tips) वाढत्या वयात लोकांना पोटाच्या चरबीचा सामना करावा लागतो. ज्यामुळे जीमपासून डाएटपर्यंत अनेक प्रयत्न करावे लागतात. लवकर वजन कमी करण्यासाठी हेल्दी वेट लॉस ड्रिंकचा डेली रूटीनमध्ये समावेश करू शकतात. ज्यामुळे पोटाची चरबी वेगाने आणि सहज कमी होण्यास मदत होईल. (How to Make Weight Loss Drink at Home)
दालचिनी आणि आल्याचा चहा
दालचिनीमुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते ज्यामुळे वजन कमी होण्यास होते. ७ दिवस दालचिनी आणि आल्याचा चहा प्यायल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल.
पोट कमीच होत नाहीये? रामदेव बाबा सांगतात खास खिचडीची रेसेपी; रोज खा-महिन्याभर स्लिम दिसाल
दालचिनीतील पोषक तत्व
मेडिकल न्यूज टु डेच्या रिपोर्टनुसार दालचीनीमध्ये एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल गुण असतात. यात मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरेस, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, मॅन्गीज, कॉपर, जिंक, व्हिटामीन, नियासिन,थियामीन, लायकोपीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. (ref) दालचिनी ब्लड शुगल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते, दालचिनीच्या सेवनाने पीपसीओएसचा त्रासही कमी होतो, इम्यून सिस्टिमही मजबूत राहते. आल्यात ९ टक्के प्रोटीन, ६० ते ७० टक्के फायबर्स आणि ३ ते ६ टक्के फॅट्स असतात. तर पाण्याचे प्रमाण ९ ते १२ टक्के असते.
वजन कमी करण्यासाठी योगासन
1) व्याघ्रसन- शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी व्याघ्रासन टायगर पोज असंही म्हणतात. यामुळे शरीराचे पोश्चर चांगले राहते. या सोप्या योगासनामुळे नितंब आणि मांड्यांवरची चरबी कमी होते. पोटाच्या मांसपेशीही मजबूत राहतात.
2) वशिष्ठासन- कोणतंही योगासन करण्याआधी वार्मअप करायला विसरू नका. एका हातावर आपलं वजन संतुलित ठेवा. ज्यामुळे मांसपेशींवर दबाव येईल आणि पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होईल.
रात्रीचं जेवण सोडल्यानं वजन कमी होतं? जेवणात १ छोटा बदल करा, कितीही खा-स्लिम राहाल
3) उत्कटासन- शरीराची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला रोज उत्कटासन करावे लागेल. ज्याला चेअर पोज असंही म्हटलं जातं. हा व्यायाम करताना मांड्या आणि नितंबांवर दबाव येतो आणि वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथ वाढते. हे योगासन रोज केल्यानं वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.