Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट-मांड्याची चरबी वाढलीये? जीम, डाएट काहीच न करता ५ गोष्टी फॉलो करा; स्लिम व्हाल

पोट-मांड्याची चरबी वाढलीये? जीम, डाएट काहीच न करता ५ गोष्टी फॉलो करा; स्लिम व्हाल

Quick Weight Loss Tips : बिझी लाईफस्टाईलमुळे वजन घटवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 03:46 PM2024-03-19T15:46:38+5:302024-03-19T18:19:39+5:30

Quick Weight Loss Tips : बिझी लाईफस्टाईलमुळे वजन घटवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

Quick Weight Loss Tips : Dr Told 5 Most Effective Weight Loss Tips For Women | पोट-मांड्याची चरबी वाढलीये? जीम, डाएट काहीच न करता ५ गोष्टी फॉलो करा; स्लिम व्हाल

पोट-मांड्याची चरबी वाढलीये? जीम, डाएट काहीच न करता ५ गोष्टी फॉलो करा; स्लिम व्हाल

वजन वाढल्यामुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. (Health Tips) ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढणं, डार्ट डिसिज, उच्च रक्तदाब, डायबिटीस यांसारख्या समस्या उद्भवतात. (Weight Loss Tips) पुरूषांसाठी वजन कमी करणं कठीण होऊ शकतं कारण त्यांना एकाचवेळी अनेक कामं करावी लागतात. (Quick Weight Loss Tips) मेटाबॉलिक एंण्ड बेरीएट्रिक सर्जन डॉक्टर राजीव मानेक सांगतात की अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे पुरूषांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढत आहे. बिझी लाईफस्टाईलमुळे वजन घटवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (Dr Told 5 Most Effective Weight Loss Tips For Women)

1) हाय प्रोटीन डाएट

नियमित आहारात २५ ते ३० टक्के प्रोटीन्स असायला हवेत. प्रोटीन्सच्या सेवनाने भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते जेणेकरून वजन कमी होईल आणि कॅलरीजचे प्रमाण कमी होईल. भरपूर फायदे मिळवण्यासाठी जवळपास ३० ग्राम उच्च गुणवत्तेचे प्रोटीन असायला हवे. प्रोटीन्समध्ये कार्बोहायड्रेटस आणि थर्मोजेनिक प्रभाव असतो. अन्न पचायला अधिक कॅलरीजची आवश्यकता असते. प्रोटीन्सयुक्त आहारत मांसपेशींसाठी फायदेशीर ठरतो. ( Dr Told 5 Most Effective Weight Loss Tips For Women)

2) योग्य प्रमाणात पाणी प्या

पाणी प्यायल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो याशिवाय अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतात. पाण्याचे सेवन केल्याने शरीर व्यवस्थित कार्य  करते. पाणी वेट लॉसच्या प्रक्रियात गुणकारी ठरते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने डिहायड्रेशची समस्या उद्भवत नाही. डिहायड्रेशन डोकेदुखी, थकवा, सुस्ती येणं, याचे कारण ठरू शकते. 

कोण म्हणतं रात्री कमी जेवल्यानं वजन घटतं? ९ गोष्टी करा, पोटभर खा-वजन भराभर कमी होईल

3) मेडियेरियन डाएट

या आहारात भाज्या, फळं, शेंगा, सुका मेवा, बीया जास्त प्रमाणात असतात. सर्वेक्षणानुसार मेडिटेरियन आहार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. वजन वाढवण्यासाठी तुम्ही कार्डिओ मेटाबॉलिक प्रोफाईल सुधारू शकता.  फिजिकल एक्टिव्हीटीजचा दीनचर्येचा समावेश करा. 

3) कार्बोहायडट्रे्सचे सेवन कमी करा

कमी कार्ब्सेच सेवन केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. कमी कार्ब्स घेतल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे आतड्यांचे आरोग्यही सुधारते. इंसुलिन संवेदनशिलताही सुधारते. 

केस पातळ झालेत-प्रचंड गळतात? आठवड्यातून एकदा 'या' पाण्याने केस धुवा; दाट- लांबसडक होतील

4) चांगली झोप घ्या

चांगली झोप वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण झोप पूर्ण न झाल्यामुळे वजन वाढते. रोज रात्री कमीत कमी ६ तासांची झोप घ्यायला हवी. नियमित व्यायाम करायला हवा. हाय इंटेसिटी इंटरव्हल ट्रेनिंग करा. ज्यामुळे वाढतं वजन कमी होण्यास मदत होईल.

Web Title: Quick Weight Loss Tips : Dr Told 5 Most Effective Weight Loss Tips For Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.