Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं आहे? मग गव्हाच्या पोळ्याऐवजी खा 'या' पिठाच्या चपात्या; वेट लॉससाठी उत्तम

वजन कमी करायचं आहे? मग गव्हाच्या पोळ्याऐवजी खा 'या' पिठाच्या चपात्या; वेट लॉससाठी उत्तम

Quinoa Chapati | Gluten-Free Quinoa Flatbread for Weight Loss : गहू नाहीतर 'या' पिठाच्या चपात्या खा; वजन घटणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2024 10:40 AM2024-03-09T10:40:14+5:302024-03-10T11:16:33+5:30

Quinoa Chapati | Gluten-Free Quinoa Flatbread for Weight Loss : गहू नाहीतर 'या' पिठाच्या चपात्या खा; वजन घटणारच

Quinoa Chapati | Gluten-Free Quinoa Flatbread for Weight Loss | वजन कमी करायचं आहे? मग गव्हाच्या पोळ्याऐवजी खा 'या' पिठाच्या चपात्या; वेट लॉससाठी उत्तम

वजन कमी करायचं आहे? मग गव्हाच्या पोळ्याऐवजी खा 'या' पिठाच्या चपात्या; वेट लॉससाठी उत्तम

भारतातील बहुतांश घरात गव्हाच्या पोळ्या तयार केल्या जातात. चपाती आणि भाताशिवाय आपली इंडियन थाळी पूर्ण होत नाही. पण हेल्दी वाटणारे चपाती-भात हे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते (Weight Loss Chapati). वजन कमी करण्यासाठी बरेच जण कार्ब्स आहारातून वगळतात. आपण आहारातून गव्हाच्या पोळ्या वगळण्यापेक्षा आपण आपल्या आहारात क्विनोआच्या पिठाच्या चपात्यांचा आहारात समावेश करू शकता (Fitness). यासह बाजरी, नाचणी, बार्ली, ज्वारीच्या भाकऱ्या देखील वेट लॉससाठी मदत करतात (Weight Loss Diet).

परंतु, क्विनोआच्या चपात्या खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? क्विनोआच्या पोळ्या कधी खाव्या? याची माहिती आहारतज्ज्ञ राधिका गोयल यांनी आपल्या सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत दिली आहे(Quinoa Chapati | Gluten-Free Quinoa Flatbread for Weight Loss).

वेट लॉससाठी क्विनोआच्या चपात्या खाण्याचे फायदे

- क्विनोआ पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने वेट लॉससाठी मदत होते. हे धान्य ग्लुटेन-फ्री आहे. यामध्ये प्रोटीनचे जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

- यासह त्यात झिंक, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. शिवाय वेट लॉससाठीही मदत करतात.

गॅसचा वापर न करता करा ३ वेट लॉस टेस्टी स्नॅक्स डिशेस; पोट होईल सपाट-शरीर दिसेल सुडौल..

- क्विनोआ पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. जे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

- क्विनोआ पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने चयापचय क्रिया बुस्ट होते. यासह पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

- यासह यात अमिनो ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

आहारात क्विनोआचा समावेश कसा करावा?

- क्विनोआच्या पिठाच्या आपण पोळ्या तयार करू शकता.

- याशिवाय व्हेज क्विनोआ पुलावही बनवता येतो.

- आपण क्विनोआ भाज्यांमध्ये मिक्स करून, यासह फळे आणि नट्ससोबतही खाऊ शकता.

क्विनोआ कधी खाऊ नये?

लग्नाची तारीख ठरली? फिटनेससाठी खाणं टाळता? ६ जबरदस्त टिप्स-लग्नात दिसाल फिट-सुडौल

आपण दिवसातून एक किंवा दोन कप शिजवलेले क्विनोआचे पदार्थ तयार करून खाऊ शकता. क्विनोआ खाल्ल्यानंतर जर आपल्याला पोटदुखी, पोटाचे विकार, खाज सुटणे किंवा उलट्या होत असल्यास क्विनोआ खाणे टाळा. 

Web Title: Quinoa Chapati | Gluten-Free Quinoa Flatbread for Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.