भारतीय पदार्थांमध्ये २ धान्यांचा वापर हमखास होतोच. गहू आणि तांदूळ. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत या दोन्ही धान्यांचा वापर होतो. गव्हाची पोळी आणि भात हे थाळीमध्ये हमखास असते. बऱ्याचदा गव्हाची पोळी आणि भात आपण हमखास खातो. अनेकदा गव्हाची पोळी वर्षभर खाल्ली जाते. तर, हिवाळ्यात बाजरी, ज्वारी आणि मकाची भाकरी खाल्ली जाते. यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि फायबरची कमतरता पूर्ण होते. पण हिवाळ्यात नक्की कोणत्या धान्याची भाकरी किंवा चपाती खावी?
नक्की कोणत्या धान्याची भाकरी खाल्ल्याने वजन कमी होते? यासह हृदयाच्या आरोग्यासाठी नाचणी, ज्वारी आणि गव्हाच्या पोळ्यांपैकी कोणता आरोग्यदायी पर्याय आहे? पाहूयात(Ragi, Jowar, Or Wheat: A Dietician’s Guide To Choosing The Healthiest Roti).
मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर
नाचणी
- नाचणी हे एक पौष्टीक धान्य आहे. जे आफ्रिका आणि दक्षिण आशिया, विशेषतः भारतात खाल्ले जाते. नाचणीमध्ये भरपूर फायबर, खनिजे आणि आवश्यक अमीनो ॲसिड असतात.
- बाजरीतील पौष्टीक घटक डायबिटीसच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते. जे वेट लॉससाठीही मदत करते.
- बाजरी हे ग्लूटेन-मुक्त धान्य आहे. यामध्ये कॅल्शियम आणि लोह देखील मुबलक प्रमाणात असते. जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि रक्तासाठीही फायदेशीर ठरते.
- बाजरी मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. याचा यसेमिक इंडेक्स कमी आहे. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.
- वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही नाचणी खूप फायदेशीर ठरते. यामुळे कोलेस्टेरॉल देखील नियंत्रित राहते.
ज्वारी
- महाराष्ट्रात ज्वारीची भाकरी हमखास खाल्ली जाते. यात फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारख्या आवश्यक पोषक घटक आढळतात.
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
- ज्वारीमध्ये फायबरचेही प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. यासह कोलेस्टेरॉल देखील कमी होते.
- यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.
- ज्वारी हे ग्लूटेन मुक्त धान्य आहे. जे पचण्यास सोपे आहे.
- ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
गहू
- गव्हाची चपाती भारतीयांच्या आहारात हमखास असतेच. यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबरही मुबलक प्रमाणात असतात.
- गव्हाची पोळी हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते.
- मात्र, गव्हाची पोळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन देखील वाढते.